Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कृषि कायद्यांविरोधात नागपुरात शेकडो ट्रॅक्टरसह हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांचा राजभवनाला घेराव

Get real time updates directly on you device, subscribe now.

केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करावेत आणि इंधन दरवाढ मागे घ्यावी 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर 16 जानेवारी :– कृषी कायदे रद्द करण्याची मागणी आणि इंधन दरवाढीविरोधात नागपूर राजभवनाला घेराव प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात घेराव घालण्यात आला.  यावेळी शेकडो ट्रॅक्टरसह हजारो काँग्रेस कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी भव्य रॅलीत सहभाग घेतला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

केंद्रातील भाजप सरकारने लोकशाही आणि संसदेचे नियम पायदळी तुडवून आणलेले कृषी कायदे शेतकऱ्यांना उद्धवस्त करणार आहेत. या कायद्यांच्या माध्यमातून बड्या उद्योगपतींचे गुलाम असणारे पंतप्रधान आता शेतकऱ्यांनाही उद्योगपतींचे गुलाम बनवू पहात आहेत. आम्ही फक्त बोलत नाही तर शेतकऱ्यांना मदत करतो आणि त्यांच्या न्याय हक्कांसाठी शेतकरी विरोधी केंद्र सरकार विरोधात संघर्षही करतो. केंद्र सरकारने एकीकडे शेती आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे उद्योग सुरु केले. तर दुसरीकडे इंधन दरवाढ करून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले. पण काँग्रेस पक्ष त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी बोलताना ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले, “मोदी सरकार सातत्याने संसद आणि संविधानाला पायदळी तुडवण्याचे काम करत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या केंद्रातील सरकारला सर्वसामान्य जनतेची चिंता नाही, तर फक्त निवडक उद्योगपतींची चिंता आहे

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.