Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अयोध्या येथील प्रभू रामचंद्राच्या मंदिर बांधकामासाठी माजी आ. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी ५ लाखांचा धनादेश प्रांत कार्यवाह दिपक तामशेट्टीवार यांना केला समर्पित

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी, दि. १७ जानेवारी: जगभरातील करोडो हिंदूंच्या आस्थेचे केंद्र असलेल्या श्रीरामजन्मभूमी अयोध्या येथे बनणाऱ्या भव्य श्रीराम मंदिर बांधकामासाठी अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी ५ लाख रुपयांची देणगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत कार्यवाह दिपकजी तामशेट्टीवार यांच्याकडे १५ जानेवारी रोजी राजमहाल अहेरी येथे सुपूर्द केली आहे.

राजे अम्ब्रिशराव आत्राम हे आपल्या दानशूर व धार्मिक वृत्तीसाठी प्रसिद्ध आहेत.  नुकतेच त्यांनी अहेरी येथील १०० वर्षं जुन्या एकमेव शिव मंदिराचे जीर्णोद्धार स्वखर्चाने करण्याचे ठरवून, त्याचे भूमिपूजन ही केले होते, आणि आता काही दिवसातच श्रीराम मंदिरासाठी इतकी मोठी देणगी दिल्याने राजे अम्ब्रिशरावच्या दानशूर वृत्तीचे जनतेमध्ये मोठी चर्चा आणि कौतुक होत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

देणगी देत असतांना संघाचे विदर्भ प्रांत कार्यवाह दिपकजी तामशेट्टीवार, चंद्रपूर विभाग प्रचारक अश्विन जयपुरकर, अहेरी जिल्हा संघचालक गजानन राहुलवार, जिल्हा अभियान सहप्रमुख संतोषजी जोशी, अभियान नगर प्रमुख अभयजी भोयर, जेष्ठ नेते प्रकाश सावकार गुडेल्लीवार हे उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.