Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

काटोल मतदार संघात गृहमंत्री अनिल देशमुख यांचे निर्विवाद वर्चस्व

Get real time updates directly on you device, subscribe now.

नरखेड तालुक्यातील १७ पैकी १६ ग्रामपंचायतीवर अनिल देशमुख गटाने विजय मिळविला आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर 18 जानेवारी:- काटोल मतदार संघात काटोल आणि नरखेड या दोन तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गटाने एकहाती विजय मिळविल्यामुळे काटोल मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापीत झाले आहे. काटोल तालुक्यातील तिनही ग्रामपंचायतीवर तर नरखेड तालुक्यातील १७ पैकी १६ ग्रामपंचायतीवर अनिल देशमुख गटाने विजय मिळविला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

काटोल तालुक्यातील भोरगड मध्ये ९ पैकी ९ ही उमेदवार, खंडाळा ग्रामपंचायत मध्ये ७ पैकी ७ ही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तर चेनकापूर-माळेगाव मध्ये ९ पैकी आठ जागांवर राष्ट्रवादी व शेकापचे उमेदवार विजयी झाले आहे. नरखेड तालुक्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गटाने नरखेड तालुक्यातील सर्वात मोठया असलेल्या जलालखेडा ग्रामपंचायत मध्ये १३ पैकी १० जागांवर, थडपवनी येथे ९ पैकी ९ जागांवर, महेंद्री येथे ७ पैकी ६, खैरगाव येथे १३ पैकी १०, सिंजर येथे ७ पैकी ५ , अंबाडा येथे ९ पैकी ७, सायवाडा येथे ९ पैकी ६ राष्ट्रवादीचे उमेदवार विजय झाले. मदना येथे राष्ट्रवादी व शिवसेना सोबत मिळुन लढली होती. येथे एकहाती या आघाडीने सत्ता मिळवित ९ पैकी ९ ही जागेवर विजय प्राप्त केला आहे.

उमठा येथे ७ पैकी ५, दातेवाडी मध्ये ९ पैकी ४, पेठमुक्तापुर ९ पैकी ६, जामगाव खु. ९ पैकी ६ , देवग्राम ९ पैकी ८, माणीकवाडा ९ पैकी ६, येरला ७ पैकी ५, देवळी ७ पैकी ५ आणि खरबडी येथे ७ पैकी ४ जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. तसेच नागपूर तालुक्यातील बाजारगाव सर्कलमधील पेठ ग्रामपंचायतीवर सर्वच्या सर्व ९ ही उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय झाले आहे. काटोल मतदार संघातील सर्व विजयी उमेदवारांचे गृहमंत्री अनिल देशमुख व जिल्हा परिषद सदस्य सलिल देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.