Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यातील एकमेव तृतीयपंथी उमेदवार असलेल्या अंजली पाटील विजयी

Get real time updates directly on you device, subscribe now.

जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वार्ड क्र. चारमधून उभ्या होत्या.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

जळगाव डेस्क 18 जानेवारी :- जळगवाच्या भादली बुद्रूक गावात अंजली पाटील या तृतीयपंथी उमेदवाराला ग्रामपंचायत निवडणुकीत भरघोस मतांनी विजय मिळवून देण्यात आलं आहे. भादली बुद्रूकच्या गावकऱ्यांच्या या निर्णयाचं खरंच स्वागत करायला हवं. कारण तृतीयपंथींकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा. त्यांच्याकडेही जबाबदारी दिली तर ते नक्कीच लोककल्याणाची कामे करुन दाखवतील, असा विश्वास खेडेगावातल्या गावकऱ्यांनी दाखवला आहे. गावकऱ्यांच्या या पावालाने समाजाता एक सकारात्मक बदलास सुरुवात झाली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल समोर येत आहे. शिवसेना आणि भाजपात चुरशीची लढत बघायला मिळत आहे. या निवडणुकीत राज्यातील एकमेव तृतीयपंथी उमेदवार असलेल्या अंजली पाटील विजयी झाल्या आहेत. अंजली या जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वार्ड क्र. चारमधून उभ्या होत्या. त्यांचा ग्रामपंचायत निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते विजयापर्यंत प्रचंड संघर्ष बघायला मिळाला. सुरुवातीला त्यांची उमेदवारी नाकारण्यात आली होती. मात्र, त्यांनी यशस्वी लढा देत उमेदवार अर्ज दाखल केला आणि त्यापुढे जाऊन त्यांनी निवडणूकही जिंकून दाखवली आहे

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.