Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अखेर कोरचीतील पारबताबाई विद्यालय झाले सुरू…

खबरदारी म्हणून शाळा होती सात दिवस बंद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

कोरची, दि. 22 जानेवारी: कोरची येथील पारबताबाई विद्यालयात कोरोना पाझीटिव्ह विद्यार्थीनी आढळले होते. खबरदारी म्हणून ही शाळा सात दिवस बंद ठेवण्याचे निर्देश माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी पत्राद्वारे दिले होते. त्यानुसार शाळा दि. 11 जानेवारी ते 18 जानेवारी पर्यंत बंद ठेवण्यात आली होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शासनाच्या आदेशानुसार 23 नोव्हेंबर पासून वर्ग 9 ते 12 सुरू झाले. त्यादृष्टीने शाळा सॅनिटाइजर करून, प्रत्येक कर्मचारी व विद्यार्थी मास्क लावणे, एका बेंचवर एक विद्यार्थी बसविणे, योग्य अंतर ठेवणे, सतत हात धुणे ह्या सूचनांचे पालन करून शाळा सुरू झाल्या.

कोरची तालुक्यातील बरेच पालक गरीब असून मोलमजुरी करण्यासाठी शहरात नेहमीच जात असतात. खबरदारी म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांची कोरोना तपासणी करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार दि. 4 जानेवारी ला शिक्षक तथा विद्यार्थ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. 11 जानेवारी ला शाळेला रिपोर्ट आली त्यात 5 विद्यार्थीनी कोरोना पाझीटिव्ह आढळून आल्या. त्यामुळे त्याच दिवशी पुन्हा सर्व कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्याची रिपोर्ट 14 जानेवारी ला प्राप्त झाली. यावेळी सुद्धा 6 विद्यार्थीनी आणि एक परिचर असे सात व्यक्ती कोरोना पाझीटिव्ह आढळून आले. ही माहिती शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना देण्यात आली होती. त्यानुसार खबरदारी म्हणून शाळा सात दिवस बंद ठेवण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी यांनी दिले होते. त्यानुसार शाळा दि 11 जानेवारी ते 18 जानेवारी पर्यंत सात दिवस बंद करून शाळा दि. 19 जानेवारी पासून नियमित सुरू झाली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

जे विद्यार्थी कोरोना पाझीटिव्ह आढळून आलीत त्यांची शिक्षणाधिकारी यांनी भेट घेऊन विचारपूस केली होती. शाळेचे मुख्याध्यापक शालीकराम कराडे हे सुद्धा कोरोना केंद्रात वेळोवेळी भेट देऊन विद्यार्थ्यांची विचारपूस करीत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जे विद्यार्थी कोरोना पाझीटिव्ह आढळून आले, त्यांची तब्येत ठणठणीत आहे. कोरोना चे कोणतेही लक्षण नाहीत. खबरदारी म्हणून सेंटरवर 14 दिवस राहणार आहेत.

शाळा सुरू करण्यापूर्वी संपूर्ण शाळा, शाळेतील सर्व खोल्या, स्वच्छता गृह नगरपंचायत कडून सॅनिटाइजर करून घेतली सर्व कर्मचाऱ्यांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. व शाळा नियमित सुरू आहे.

Comments are closed.