Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दोन अंड्यावरुन नवरा-बायकोचा तंटा! अन् पोलीस स्टेशनमध्ये अंडे का फंडा..

Get real time updates directly on you device, subscribe now.

बुलढाण्यातला अंडे का झगडा सध्या चर्चेत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

बुलढाणा, दि. २५ जानेवारी: नवरा बायकोमध्ये कधी कधी भांडणं होत असल तरी ते अतुट बंधन असतं. पण कधी कधी ते विकोपाला जाण्यास वेळ लागत नाही. असंच एका जोडप्याचं भांडण झालं. पण ते कशावरून? विचारा. अहो चक्क दोन अंड्यावरून. आणि हे भांडण थेट पोलिस स्टेशनमध्ये देखील पोहोचलं.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेडा पोलीस स्टेशनमध्ये अनेक घटनांची आणि गुन्ह्यांची नोंद याठिकाणी होत असते.  मात्र एका विचित्र भांडणामुळे पोलिसही चक्रावून गेले. कारण हे भांडण होतं पती आणि पत्नीचे आणि ते चक्क दोन अंड्यांवरून.

पतीने संध्याकाळी जेवणासाठी दोन अंडे आणलेत पत्नीला सांगितले कि याची मला भाजी करून दे पत्नीने भाजी तर केली. मात्री नवऱ्याला अंड्याची भाजी करून देण्याऐवजी बायकोनं ती अंडी मुलीला खाऊ घातली. मग काय, नवरोबांचा राग अनावर झाला… आणि दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. वाद एवढा वाढला की प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलं.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अंड्यावरून सुरू झालेलं हे नवरा बायकोचं भांडण ऐकून पोलिसांनी डोक्याला हातच लावला. हा विचित्र तंटा कसा मिटवायचा, मोठा पेचच होता. पण पोलिसांनी अफलातून अंडे का फंडा शोधला.

पोलीसांनी दोघांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. दोघांची वेगवेगळी बाजू होती. अंड हेच भांडणामागचं कारण आहे हे त्यानंतर पोलिसांना स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिसांनी स्वत:कडून दोन अंडी देत दोघांचं भांडण मिटवलं. दोघेही आनंदाने अंडी हातात घेऊन घरी गेले. 

अंडी आणि त्यावरून झालेलं अनोखं भांडण आणि पोलिसांनी शोधलेली अफलातून आयडिया. पुढच्या वेळी घरात अंडी आणाल, तेव्हा हा किस्सा आठवून हसू आल्याशिवाय राहणार नाही.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.