Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोरची नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढणार – तालुका प्रमुख रमेश मानकर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

कोरची, दि. 26 जानेवारी: नगरपंचायती मध्ये निवडणूकीचे वारे जोरदार सुरू आहेत. प्रत्येक पक्ष आपापले उमेदवार ठरवित आहेत. राज्यात महाआघाडीची सरकार आहे. त्यामुळे राज्यातील नगरपंचायत, जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीची निवडून आघाडी ने लढले जाईल असा संदेश असावा असे वाटते. परंतु कोरचीत शिवसेना नगरपंचायतच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे तालुका अध्यक्ष रमेश मानकर यांनी सांगितल्याने निवडणुकीला वेगळेच वळण मिळत आहे.

मागील पाच वर्षांत नगराचा पाहिजे तसा विकास झाला नाही. नगरपंचायतीची स्थापन झाल्यानंतर शहराचा विकास होईल अशी अपेक्षा होती मात्र पूर्वी जशी स्थिती होती तशीच स्थिती आजही बघायला मिळत असल्याने कोरची नगरपंचायत विकास आराखडा तयार करुन आगामी नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना 17 ही वार्डत उमेदवार उभे करणार असल्याचे शिवसेना तालुका प्रमुख रमेश मानकर यांनी स्पष्ट केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गावात केवळ सिमेंट कॉक्रिट नाली सोडून अन्य कोणतीही विकास कामे झाली नाही. नालेसफाई, पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे .सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी व्यापार संकुले बांधकाम .

मागणी पाच वर्षाच्या कार्यकाळात अंदाजे दोन ते अडीच वर्षच कोरचीकरांना नळाचे पिण्याचे पाणी बरोबर नाही बाकी दिवस तर नळयोजना कधी सुरू तर कधी बंद अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील काही प्रभागांमध्ये अजूनही पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीरच आहे. नाले सफाई पाहिजे त्या प्रमाणात कोणत्याच प्रभागांमध्ये झाली नसल्याने डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे तर बाधकांम करण्यात आलेल्या नालीचे नियोजन बद्ध बांधकाम न केल्याने नालीचे पाणी घरात घुसून नासाडी करीत आहे . कोरची ग्रामपंचायतीचे नगरपंचायती मध्ये रुपांतर झाल्याने नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या पण सत्ता पक्ष विरोधी पक्ष नेत्यानी कोरची नगरपंचायत विकास स्वप्न धुळीस मिळवले.त्यामुळे कोरची नगरपंचायत चा विकास आराखडा तयार करून शिवसेना कोरची नगरपंचायतीच्या विकासासाठी संपूर्ण ताकदीनिशी स्वबळावर निवडणुका लढल्या जातील असे स्पष्ट केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कोरचीकरांनी नगरपंचायती मध्ये भाजपला एक हाती सत्ता दिली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी बाकावर होते. परंतु या पाच वर्षात कोणताच विकास केला नाही .तिन्ही पक्षाचे पुढारी नगरपंचायत मध्ये असताना विकास केला नाही .त्यामुळे या तिन्ही पक्षावर कोरची नगरातील मतदारांचा विश्वास नाही .त्यामुळे आगामी नगरपंचायत निवडणुकीत लोक शिवसेनेवर विश्वास व्यक्त ठेवून मतदान करतील अशी आशा आहे.असे मानकर म्हणतात.असे झाले तर, आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस-कॉग्रेस आघाडी, भाजप, शिवसेना अशी रंगत निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments are closed.