Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आरमोरी तालुक्यातील पहिल्या टप्प्यातील १४ ग्रामपंचायतीवर सरपंच व उपसरपंच विराजमान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. १३ फेब्रुवारी: गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील एकूण ३२ ग्रामपंचायतीपैकी २९  ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम दिनांक १२ फेब्रुवारी व १५  फेब्रुवारी आशा दोन टप्प्यात आखण्यात आला. दिनांक १२ फेब्रुवारीला तालुक्यातील पहिल्या टप्प्यातील १४ ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदासाठी निवडणूक तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांनी नेमून दिलेल्या अध्यासी निवडणूक अधिकारी याद्वारे घेण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आरमोरी तालुक्यातील वघाळा, सायगाव, इंजेवारी, ठाणेगाव, वडधा, मोहझरी, भाकरोंडी, देलनवाडी, वासाळा, डोंगरसावंगी, मानापुर, शिवनी (बु), जोगीसाखरा, कुरंडीमाल, अशा १४ ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचाची निवड करण्यात आली.

वघाळा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मिथुन प्रधान तर उपसरपंचपदी पुष्पा अनोले, सायगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शीतल धोटे तर उपसरपंचपदी मनोज पांचलवार, इंजेवारी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अलकाताई कुकडकर तर उपसरपंचपदी मंगेश पासेवार, ठाणेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वासुदेव मंडलवार तर उपसरपंचपदी स्नेहा भांडेकर, वडधा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रिया गेडाम तर उपसरपंचपदी विलास सेलोटे, मोहझरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मयुर कोडाप तर उपसरपंचपदी संतोष निकुरे, भाकरोंडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विलास उसेंडी तर उपसरपंचपदी दिगंंबर राऊत, देलनवाडी ग्रामपंचायत सरपंचपदी शुभांगी मसराम तर उपसरपंचपदी त्रिलोक गावतुरे, वासाळा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रत्नमाला सेलोटे तर उपसरपंचपदी उज्वला मंगरे, डोंगरसावंगी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुलभा गेडाम तर उपसरपंचपदी टीकाराम नारनवरे, कुरंडीमाल ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनंदा मडावी तर उपसरपंचपदी शारदा मडावी, शिवनी (बु) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पुरुषोत्तम दोनाडकर तर उपसरपंचपदी सुरेश ढोरे, तर  मानापूर ग्रामपंचायत च्या सरपंचपदी कुंता दुर्गादास नारनवरे तर उपसरपंचपदी वैशाली रंजीत खुणे यांची  तर जोगिसाखरा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संदीप ठाकूर यांची निवड करण्यात आली. जोगीसाखरा येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी एकाही सदस्याने अर्ज सादर न केल्याने सरपंच पद रिक्त ठेवण्यात आले आहे. आरमोरी तालुक्यातील उर्वरित १५ ग्रामपंचायतच्या म्हणजेच वैरागड, कासवी, पळसगाव, देलोडा(बु.), डोंगरगाव(भु.), चामोर्शी(माल), कोरेगाव, चुरमुरा, देऊळगाव, कुलकुली, सिर्सी, पिसेवडधा, शंकरनगर, बोरीचक, किटाळी आदी ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंचाची निवडणूक १५ फेब्रुवारीला होणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.