Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पेट्रोल 100 च्या उंबरठ्यावर!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. 14 फेब्रुवारी: देशात सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ कायम आहे. पेट्रोलच्या दरात 28 पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरात 34 पैशांनी वाढ झाली आहे. या दरवाढीसह मुंबईत पेट्रोलचे दर 95.19 रुपयांवर पोहोचले आहेत. तर डिझेलचे दर 86.02 रुपयांवर पोहेचले आहेत. पेट्रोलच्या डिझेलच्या दरात दिवसेंदिवस अशीच वाढ सुरु राहिली तर इंधनाचे दर लवकरच शंभरी गाठतील यात शंका नाही.

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या वाढत्या किमतीमुळे इंधन दरवाढ होताना दिसत आहे. मात्र कच्च्या तेलाची किंमत पुन्हा कमी होऊ शकते, ज्यामुळे इंधनांच्या किंमतीतही घसरण होण्याची शक्यता वर्तवला जात आहे. मात्र सध्याच्या स्थितीत पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांमुळे नागरिकांचा खिसा रिकामा होताना दिसतोय. पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्याने इतर जीवनावश्यव वस्तूच्या किमतीतही वाढ होताना दिसते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुंबई
पेट्रोल- 95.19 रुपये
डिझेल- 86.02 रुपये

पेट्रोल-95.45
डिझेल- 8494

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

भिंवडी
पेट्रोल- 94.84
डिझेल- 84.35

रत्नागिरी

पेट्रोल – 96.66

डिझेल – 86.16

परभणी
पेट्रोल- 97.32 रुपये
डिझेल- 86.77 रुपये

नागपूर

पेट्रोल – 95.39 रुपये

डिजेल – 85.29 रुपये

इंधन कसे महाग होते?

परदेशी बाजारातून कच्चे तेल अत्यंत स्वस्त किंमतीत मिळते. पेट्रोल पंपावर येता येता ते महाग होतं. त्यात कोणते कर जोडले जातात? भारत पेट्रोलियम पदार्थ आपल्या गरजेजनुसार आयात करतो म्हणजे दुसर्‍या देशातून खरेदी करतो. तेल आयात केल्यानंतर ते रिफायनरीला पाठवले जाते. येथे या कच्च्या तेलामधून पेट्रोल, डिझेल आणि इतर पेट्रोलियम पदार्थ काढले जातात. रिफायनरीमधून हे तेल पेट्रोल आणि डिझेल विकणार्‍या कंपन्यांना जाते. जसे इंडियन ऑईल, हिंदुस्तान पेट्रोलियम. या कंपन्या त्यांचा नफा काढून घेतात. या कंपन्या पेट्रोल आणि डिझेल पेट्रोल पंपावर वाहतूक करतात, त्यानंतर पेट्रोल पंप मालक देखईल विकताना कमिशन घेतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 2 प्रकारचे कर देखील जोडले जातात. केंद्र सरकारची उत्पादन शुल्क आणि राज्य सरकारांचं व्हॅट. व्हॅट म्हणजेच मूल्यवर्धित कर दर जो प्रत्येक राज्यात वेगळा असतो. हे सर्व जोडल्यानंतर कच्च्या तेलाची किंमत तीनपट महाग होते.

Comments are closed.