Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अवकाळी पावसाने उस्मानाबाद जिल्ह्यातील फळबागांचे आणि रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

उस्मानाबाद, दि. १९ फेब्रुवारी: 18 फेब्रुवारी च्या मध्यरात्री आणि 19 फेब्रुवारी च्या पहाटे उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील फळबागा तसेच रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील ज्वारी हरभरा या पिकांचे तसेच आंबा मोसंबी पपई या फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कळंब तालुक्यातील शिराढोण परिसरात आंबा आणि मोसंबी फळबागांना याचा मोठा फटका बसला असून आधीच कोरोना मुळे परेशान असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे यावर्षी आंबा चे पीक मोठ्या प्रमाणावर आले होते तसेच मोसंबीच्या झाडांनाही पीक धारणा चांगली झाली होती. परंतु अवकाळी पाऊस आणि या दरम्यान आलेल्या वाऱ्यामुळे संपूर्ण आंबा पीक आणि मोसंबी झाडावरून जमीनदोस्त झाल आहे. या फळबागांचे तातडीने पंचनामे होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी फळबाग शेतकऱ्यांकडून आता होऊ लागली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.