Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

इंधनाच्या वाढत्या किंमतीचा परिणाम सर्वच क्षेत्रावर, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर

Get real time updates directly on you device, subscribe now.

इंधन दर वाढीचा परिणाम केवळ ग्राहकांवर होतो असं नाही तर उत्पादन क्षेत्र तसेच इतरही क्षेत्रांवरही होतोय असं मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क 25फेब्रुवारी:– देशात गेले काही दिवस इंधानांच्या किंमतीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्याचा परिणाम उद्योगांच्या उत्पादन क्षमतेवर तसेच वाहतूक आणि इतर क्षेत्रावर होईल असं मत रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी व्यक्त केलंय. ते गुरुवारी बॉम्बे चेम्बर्स ऑफ कॉमर्सच्या 185 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, “इंधनाच्या वाढत्या किंमती या ग्राहकांवर परिणाम करतातच, त्याचसोबत सर्वच क्षेत्रावर त्यांचा परिणाम होतो. केवळ बाईक वा कार मालकांच्यावर याचा परिणाम होत नसून त्याचा परिणाम उत्पादन क्षेत्र, वाहतूक आणि इतरही क्षेत्रावर पडतोय.”

पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र आणि राज्य या दोघांकडूनही अप्रत्यक्ष कर लावण्यात येतोय. सध्या देशात पेट्रोलवर 60 टक्के तर डिझेलवर 54 टक्के कर लावण्यात येतोय. दोन दिवसांपूर्वी इंधनाच्या वाढत्या किंमतीवर भाष्य करताना शक्तीकांत दास म्हणाले होते की, “केंद्र आणि राज्यांनी समन्वय ठेऊन पुरवठ्याच्या बाजूने काही प्रमाणात कर कमी केल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट होऊ शकेल.”

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सध्या केंद्र सरकारकडून पेट्रोलवर 32.98 प्रति लिटर तर डिझेलवर 31.83 रुपये प्रती लिटर इतका कर लागतो. आता यावरच कर थांबत नाही. राज्य सरकार त्यावर वेगळा कर लावते. महाराष्ट्र सरकार पेट्रोलच्या किंमतीवर 25 टक्के व्हॅट लावते तर डिझेलवर 21 टक्के व्हॅट लावते. आता यावरही अधिकचा सेस लावला जातो. पेट्रोलवर 10 रुपये प्रती लिटर तर डिझेलवर 3 रुपये प्रति लिटर इतका सेस लावण्यात येतो.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.