Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कव्वा बिर्याणी फेम अभिनेता विजय राज यांचेवर विनयभंगाचा गुन्हा दाखल..गोंदिया येथील रामनगर पोलीसांनी केली अटक..

Get real time updates directly on you device, subscribe now.

शुटींग दरम्यान हाँटेल गेटवे येथे सोबत असलेल्या 30 वर्षीय युवतीचा विनयभंग..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

गोंदिया, दि. ०३ नोव्हें: मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात विद्या बालन प्रमुख भुमिकेत असलेल्या शेरनी चित्रपटाच्या शुटींगदरम्यान आणि गोंदियातील हाँटेल गेटवे येथे कव्वा बिर्याणी फेम अभिनेता विजय राज यांनी सहकारी स्टाफ असलेल्या युवतीची छेडछाड केल्याने विजय राज यांचेवर गोंदियात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. रामनगर पोलीसांनी काल रात्री त्यांना अटक केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शेरनी चित्रपटाचे सर्व कलाकार आणि स्टाँफ हे गोंदियातील प्रसिद्ध हाँटेल गेटवे येथे मागील पंधरा दिवसांपासून मुक्कामी असून गोंदियातून दररोज ते शेरनी चित्रपटाच्या शुटींगसाठी बालाघाटला जातात. दरम्यान शुटींगदरम्यान आणि हाँटेलमध्ये विनोदी अभिनेता विजय राज यांनी आपल्या स्टापमधील युवतीची छेड काढल्याने युवतीच्या तक्रारीवरून गोंदियातील रामनगर पोलीसांनी विनयभंग केल्याप्रकरणी कलम ३५४(अ,ड) अन्वये गुन्हा दाखल करुन विजय राज यांना अटक करण्यात आली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आज दुपारी २ वाजता त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.याप्रकरणाविषयी पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात येत असून हाँटेल गेटवे प्रशासनाकडूनही सारवासारव करण्यात येत असून पत्रकारांनाही हाँटेलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.