Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

७० लाखांची खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या १० नक्षल समर्थकांना अटक

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

अहेरी, दि. २७ नोव्हेंबर: नक्षलवादी असल्याचे सांगून बांधकाम कंत्राटदाराकडून ७० लाख रुपयांची खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या १० नक्षल समर्थकांना अहेरी तालुक्यातील पेरमिली उपपोलिस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे.

चैनू आत्राम (३९), दानू आत्राम (२९) दोघेही रा. आलदंडी, शामराव वेलादी (४५), संजय वेलादी (३९), किशोर सोयाम (३४) तिघेही रा. चंद्रा, बाजू आत्राम (२८), रा. येरमनार टोला, मनिराम आत्राम (४५) रा. रापल्ले, जोगा मडावी (५०) रा. येरमनार टोला, लालसू तलांडे (३०) रा. येरमनार व बजरंग मडावी (४०) रा. मल्लमपल्ली ता. अहेरी अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

काही जणांनी नक्षल्यांच्या वेशभूषेत ५ नोव्हेंबरच्या रात्री बांडिया नदीवर सुरु असलेल्या पुलाच्या बांधकामस्थळी जाऊन तेथील कर्मचाऱ्याचे अपहरण केले. त्यानंतर त्यास ७० लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास बांधकाम साहित्याची जाळपोळ करुन जीवे मारण्याची धमकीही त्यांनी दिली. यासंदर्भात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता सर्व जण नक्षल समर्थक असल्याचे निष्पन्न झाले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

याप्रकरणी उपरोक्त १० जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून नक्षल गणवेश, भरमार बंदुका व अन्य साहित्य ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हे देखील वाचा :

सुरजागडच्या लोहखनिज उत्खननाविरोधात विधिमंडळात आवाज उठविणार : आमदार जयंत पाटील

राज्यपालांनी शहिदांना चप्पल घालून आदरांजली वाहिल्याने चर्चेला उधाण

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.