Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जुगल बोम्मनवार “गडचिरोली जिल्हा भुषण पुरस्कार” ने सन्मानित

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

दक्षिण गडचिरोली भागात स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन या कार्यात उल्लेखनीय काम करीत असल्याने जुगल बोम्मनवार यांना ग्लोबल स्काॅलरस् फाऊंडेशन, पुणे यांच्या कडून गडचिरोली भूषण पुरस्कार २०२२ देऊन सन्मानित करण्यात आल्याने त्यांच्यावर सर्वत्रच ठिकाणी कौतुकाचे वर्षाव होत आहे.

गडचिरोली, दि. २८ नोव्हेंबर : जिल्हा भूषण पुरस्कार सत्कार हा सोहळा दि. २६ नोव्हेंबर २०२२ रोजी अण्णा भाऊ साठे सभागृह पुणे येथे ग्लोबल फाऊंडेशन स्काॅलरस् पुणे च्या वतीने पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते चाणक्य अकॅडमी अहेरी व आलापल्ली चे संचालक जुगल एस.बोम्मनवार यांना गडचिरोली जिल्हा भूषण पुरस्कार २०२२ देऊन सन्मान करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ग्लोबल स्काॅलरस् फाऊंडेशन, पुणे यांच्या कडून राज्यस्तरीय भूषण पुरस्कार प्रत्येक जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक व कृषी तथा उद्योजक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारी व्यक्तीना जिल्हा भूषण पुरस्कार २०२२ यावेळी प्रदान करण्यात आला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

७० लाखांची खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या १० नक्षल समर्थकांना अटक

 

सुरजागडच्या लोहखनिज उत्खननाविरोधात विधिमंडळात आवाज उठविणार : आमदार जयंत पाटील

 

 

Comments are closed.