Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रानभुमी परिसरातील १६ ड्रम मोहफुलाचा सडवा नष्ट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दि ९ एप्रिल : तालुक्यातील रानभूमी-जांभळी जंगल परिसरातील दारूअड्डे व १६ ड्रम मोहफुलाचा सडवा नष्ट केल्याची कृती गडचिरोली पोलिस व मुक्तीपथ टीमने संयुक्तरीत्या केली.  या कारवाईमुळे दारूविक्रेत्यांचे मोठे नुकसान करण्यात यश आले आहे.

गडचिरोली सीमेवर रानभुमी-जांभळी जंगल परिसरात दारूअड्डे लावून दारू गाळली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलीस विभाग व गडचिरोली मुक्तिपथ तालुका चमूने शोधमोहीम राबवली असता,  यावेळी विविध ठिकाणी दारू गाळण्यासाठी टाकलेला लाखो रुपये किंमतीचा १६ ड्रम मोहफुलाचा सडवा आढळून आला.

यावेळी संपूर्ण साहित्यांसह मोहफुलाचा सडवा नष्ट करण्यात आला. ही कार्यवाही पोलीस निरीक्षक अरविंद कतलाम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार शिवदास दुर्गे, मुक्तिपथ तालुका संघटक अमोल वाकुडकर, उपसंघटक रेवणाथ मेश्राम यांनी केली.

हे देखील वाचा,

 

https://loksparsh.com/top-news/police-forces-thwarted-naxalites-intention-to-cause-casualties-in-tipagad-forest/36775/

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

https://loksparsh.com/national/lic-fined-2-lakhs-for-filing-a-case-by-concealing-true-information/36783/

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

https://loksparsh.com/maharashtra/two-trucks-transporting-sand-invalided-after-inspection-on-mega-mineral-system/36786/

Comments are closed.