Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दुर्गम बारसेवाडा वासियांचा मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

घरगुती दारूचा वापर बंद करण्याचे आवाहन ..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दि ९ एप्रिल : एटापल्ली तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या बारसेवाडा येथे मुक्तिपथ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकूण ४८ जणांनी सहभाग घेतला. दरम्यान, ग्रामस्थांना घरगुती दारूचा वापर बंद करून व्यसनमुक्त राहण्याचे आवाहन करण्यात आले.

बारसेवाडा येथे रनफार मुक्तिपथ कार्यक्रमामध्ये पुरुष गट १४, महिला गट १२, युवक गट १५, युवती गट १२ अशा एकूण ५२ स्पर्धकांनी नाव नोंदणी केली व चारही गटातुन एकूण ४८ स्पर्धकानी दौड लावली. स्पर्धेत पहिला व दुसरा क्रमांक पटकाविलेल्या स्पर्धकांना मान्यवरांच्याहस्ते मेडल, प्रमाणपत्र व दुपट्टा देऊन सन्मानित करण्यात आले.

त्यांनतर स्पर्धेचे रूपांतर सभेत करून मुक्तीपथ गाव संघटनेच्या सदस्यांना कायद्याचे पुस्तक देण्यात आले. सोबतच दारूबंदी, खर्राबंदी कायद्याची माहिती देऊन व्यसनमुक्त राहण्याकरिता मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेऊन आपल्या गावातील घरगुती दारूचे वापर कमी करावे व खर्रा विक्री बंदी करण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी गावातील पाटील लालू रेणू मडावी, मधुकर मडावी, आशा वर्कर सावित्री आतलामी व जिप शाळेतील मुख्याध्यापक शेख, दहागावकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन मुक्तीपथ कार्यकर्ता रवि वैरागडे व स्पार्क कार्यकर्ती रूनाली कुमोटी यांनी केले.

हे देखील वाचा,

 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

https://loksparsh.com/top-news/police-forces-thwarted-naxalites-intention-to-cause-casualties-in-tipagad-forest/36775/

 

खरी माहिती लपवून खटला दाखल केल्याप्रकरणी एलआयसीला दोन लाखांचा दंड

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

महाखनिज प्रणालीवर तपासणी अंती रेती वाहतूक करणारे दोन हायवा अवैध

Comments are closed.