Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महानायक अमिताभ बच्चन यांच्या अपघातानंतर प्रकृती अद्यापही नाजूक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

‘प्रोजेक्ट K’ सिनेमा ५०० रुपयांच्या बजेटमध्ये साकारण्यात येत आहे. ‘प्रोजेक्ट K’सिनेमा भारतातील सर्वांत जास्त बजेट असलेला सिनेमा असल्याचं सांगण्यात येत आहे. ‘प्रोजेक्ट K’सिनेमा १२ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. सध्या बिग बी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहेत.

मुंबई दि ९ : बिग बीं अमिताभ बच्चन यांचा काही दिवसांपूर्वी ‘प्रोजेक्ट के’ सिनेमाची शुटिंग करत असताना मोठा अपघात झाला. वयाच्या ८० व्या वर्षी ॲक्शन सीन शुट करताना बिग बींचा अपघात झाला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बिग बीं अमिताभ बच्चन च्या अपघाताची माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचल्यानंतर चाहते चिंता व्यक्त करत आहेत. अपघातानंतर खुद्द बिग बींनी त्यांच्या ब्लॉगच्या माध्यमातून अपघातात जखमी झाल्याची माहिती दिली होती. एवढंच नाही तर, काही दिवसांपूर्वी प्रकृती सुधारत आहे आणि शुटिंगला देखील सुरुवात केल्याची माहिती अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांना दिली. पण आता अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे. बिग बींची प्रकृती अद्याप नाजूक असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगच्या माध्यमातून शुटिंगला सुरुवात केल्याची माहिती दिली होती. अपघातानंतर ते अनेक दिवसांनी कामावर परतले होते. अमिताभ बच्चन यांनी पुन्हा शुटिंगला सुरुवात केल्याचं कळताच चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. सोशल मीडियावर देखील अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पण आता अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तीने त्यांच्या प्रकृतीबद्दल मोठा खुलासा केला आहे. त्यांची प्रकृती स्थिर होण्यासाठी आणखी काळ लागेल. एक महिन्यापूर्वी अमिताभ बच्चन यांच्या बरगडीच्या दुखापतीनंतर ते प्रथमच एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी बाहेर पडले. डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध बिग बी घराबाहेर पडले. पण अद्याप त्यांची प्रकृती नाजूक असल्यामुळे काही दिवसांनंतर बिग बी पुन्हा शुटिंगसाठी सुरुवात करतील अशी माहिती समोर येत आहे.

अमिताभ बच्चन यांच्या जवळच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना लवकरच शुटिंगसाठी जायचं आहे, पण प्रकृती स्थिर होण्यासाठी आणखी काही काळ लागेल. या वयात कोणताही धोका पत्करू शकत नाही. त्यामुळे जोपर्यंत नियमित शूट पुन्हा सुरू करण्याचा प्रश्न आहे, त्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

वयाच्या ८० व्या वर्षी ॲक्शन सीन शुट करताना बिग बीं अमिताभ बच्चनचा अपघात झाला आहे.बिग बीं अमिताभ बच्चन च्या अपघाताची माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचल्यानंतर चाहते चिंता व्यक्त करत आहेत. अपघातानंतर बिग बी यांच्या बरगड्यांना दुखापत झाली आहे. त्यांना श्वास घेण्यासाठी देखील त्रास होत असल्यामुळे शुटिंग रद्द करण्यात आली आहे.

‘प्रोजेक्ट K’ सिनेमा ५०० रुपयांच्या बजेटमध्ये साकारण्यात येत आहे. ‘प्रोजेक्ट K’ सिनेमा भारतातील सर्वांत जास्त बजेट असलेला सिनेमा असल्याचं सांगण्यात येत आहे. ‘प्रोजेक्ट K’सिनेमा १२ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. सध्या बिग बी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहेत.

हे देखील वाचा ,

खरी माहिती लपवून खटला दाखल केल्याप्रकरणी एलआयसीला दोन लाखांचा दंड

https://loksparsh.com/top-news/police-forces-thwarted-naxalites-intention-to-cause-casualties-in-tipagad-forest/36775/

अवैध सागवान तस्करी रोखण्यासाठी आंतरराज्यीय (महाराष्ट्र-तेलंगाना) समन्वय सभेचे आयोजन संपन्न

Comments are closed.