Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अवकाळी वादळी पावासामुळे मंदिराच्या शेडवर कोसळले झाड, चौघांचा मृत्यू, १२ जणांना वाचवले,

वादळी पावासामुळे अकोल्यातील पारस गावातील एका मंदिराच्या शेडवर लिंबाचं मोठं झाड झाड कोसळले.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अकोला ९ एप्रिल : राज्यभरात  सध्या अवकाळी वादळी पावासानी कहर माजविला असून  पावसामुळे शेतकऱ्यांचे फार  मोठे नुकसान झाले आहे. आज अकोल्यातही अवकाळी पावासाने हजेरी लावली. यात  वादळी पावासामुळे अकोल्यातील पारस गावातील एका मंदिराच्या शेडवर झाड कोसळले. या घटनेत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर १२ जणांना वाचवण्यात यश आले आहे. या शेडखाली काही भाविक दबल्याची भीती नागरिकत व्यक्त करण्यात येत आहे. सध्या रात्रीची वेळ  असल्याने शेडवर पडलेलं झाड  काढण्यासाठी  पावसामुळे  मोठी अडचणीला सामना करावा लागत आहे .

वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस तर काही ठिकाणी गारांचा पाऊस पडत आहे. अकोला जिल्ह्यातील पारस गावात वादळानं लिंबाचं मोठं झाड बाबूजी महाराज मंदिराच्या शेडवर कोसळले. घटनास्थळावर हवा आणि पावसाने मदत कार्यात अडचण होत आहे. स्थानिकांच्या मदतीने हे झाड हटवण्याचे काम सुरु आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नाशिक जिल्ह्यात जोरदार अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल; हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान…

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

एकीकडे आधीच शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला असतानाच आता दुसरीकडे निसर्गाने ही शेतकऱ्याला मोठा फटका दिला आहे. आज सायंकाळी सात वाजेनंतर नाशिक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली,या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झालं आहे.

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, निफाड, सिन्नर, दिंडोरी, कळवण, सटाणा या तालुक्यात ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार वाऱ्यासह पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण दिसून येत होतं, त्यात हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली आहे. एकीकडे मालाला भाव मिळत नाही, दुसरीकडे अवकाळी पावसाचे आगमन यामुळे बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे.

अवकाळी पाऊस जोरदार बरसल्याने नाशिक शहरासह अनेक ठिकाणी बत्ती गुल झाली आहे. ग्रामीण भागात याचा परिणाम दिसून येत आहे, जोरदार अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यात द्राक्ष, कांदा, गहू, आंबा, फळभाज्या, पालेभाज्या काढणीला आलेल्या असताना अचानक पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने नाशिक शहरासह जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी बीड जिल्ह्यात झालेले नुकसानीची पाहणी करीत घेतली दखल..

राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी चर्चा होत असून मदतीबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी बीड जिल्ह्यात झालेले नुकसानीची माहिती देण्यात आली त्याची दखल घेत गारपीट, अवकाळी पाऊस व वादळीवारा मुळे नुकसान झालेल्या फळबाग, मिरची, कांदा, भाजीपाला आदी पिकांची पाहणी केली. सोबतच पिंपरनई येथे वादळीवाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या घरांची नुकसान झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यांनी संवेदनाशील होत यावेळी त्यांना धीर दिला.

हे देखील वाचा ,

महानायक अमिताभ बच्चन यांच्या अपघातानंतर प्रकृती अद्यापही नाजूक

https://loksparsh.com/top-news/police-forces-thwarted-naxalites-intention-to-cause-casualties-in-tipagad-forest/36775/

पालघर जिल्ह्यात 2023 मध्ये पहिला कोरोनाने मृत्यू

Comments are closed.