Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पालघर जिल्ह्यात 2023 मध्ये पहिला कोरोनाने मृत्यू

वेळेवर व्हेंटिलेटर उपलब्ध झाले नाही.. आरोग्य यंत्रणा सुस्तावली

पालघर जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढत असून, बुधवारी पालघर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या डेडिकेटेड कोविड हेल्थ रुग्णालयात दाखल असलेल्या ५५ वर्षीय करोनाग्रस्त महिलेचा वेळेवर व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याने बुधवारी सायंकाळी मृत्यू झाला.
लोकस्पर्श न्युज नेटवर्क

पालघर , 8 एप्रिल :- पालघर जिल्ह्यात जिल्ह्यातील  2023 मधील हा पहिला कोरोनामृत्यू आहे. त्यामुळे आता तरी सुचवलेली आरोग्य यंत्रणा जागी होईल का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. बोईसर नजीकच्या एका गावातील महिलेला श्वसनाचा त्रास होत असल्याने बुधवारी दुपारी बोईसर येथील सरकारी टीमा कोरोना केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची ऑक्सिजन पातळी ७८ होती. मात्र तेथे व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याने तिला तातडीने पालघरच्या हेल्थ युनिट या करोना उपचार रुग्णालयात हलवण्यात आले.मात्र ऑक्सिजन पातळी ४५ पर्यंत घसरल्याने, तिला व्हेंटिलेटरची आवश्यकता होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मात्र जिल्ह्यातील पालघर व बोईसर येथील दोन्ही रुग्णालयांत व्हेंटिलेटरची व्यवस्था नसल्याने तिला मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात हलवण्याची तयारी करत असतानाच, रात्री तिचे निधन झाले. तिला व्हायरल न्यूमोनियासह करोनाची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे.पालघर जिल्ह्यात गेल्या आठवड्यात ६२ करोना रुग्णांवर उपचार सुरू होते. पालघरच्या ग्रामीण भागात ३३, तर वसई विरार महापालिका क्षेत्रात २९ रुग्णांवर घरीच उपचार सुरू होते. त कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आरोग्य यंत्रणेने सतर्क राहून कोरोनासाठी विशेष युनिट सुरू करणे आवश्यक आहे.

विशेष म्हणजे बोईसर परिसरात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे मात्र तरी देखील टिमा रुग्णालयात कोरोना युनिट सुरू करण्यास प्रशासनाकडून चालढकल केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. शिवाय पालघरमध्ये करोनाची साथ २०२० मध्ये सुरू झाल्यानंतर, पालघर जिल्ह्यात केंद्र आणि राज्य सरकारकडून व्हेंटिलेटर देण्यात आले होते ते व्हेंटिलेटर गेले कुठे ? असा प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे प्रशासनाच्या या ढीसाळ कारभाराविरोधात नागरिकांमध्ये संतापचा वातावरण निर्माण झाले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.