Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राजुर्‍यात गांजा तस्करांकडून 70 किलो गांजा जप्त; चौघांना ठोकल्या बेड्या, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

चंद्रपूर, दि. 20 डिसेंबर: जिल्ह्याच्या सिमेलगत असलेल्या तेलंगणा राज्यातून राजुर्‍यात अंमली पदार्थाची (गांजा) तस्करी करणार्‍यांचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. राजुरा येथील शिवाजीनगरातून तब्बल 70 किलो गांजासह 10 लाख 41 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला गेला. या प्रकरणी चौघांना बेड्या ठोकल्या. ही कारवाई शनिवार, 19 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास करण्यात आली.

सतिष तेलजीरवार, सुनील दादाजी मडावी, नजिरशहा शहेनशहा, पुरूषोत्तम जर्जीर्ला अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तेलंगणा राज्यातून राजुरा शहरात गांजाची तस्करी केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. माहितीच्या आधारे राजुरा शहरातील शिवाजीनगर गाठले. तिथे संतोष तेजजिरवार या आरोपीच्या घराची झडली असता, घरामध्ये 69 किलो 125 ग्रॅम गांजा आढळून आला. त्याच्या घरात अन्य तिघे जण बसून होते. त्यांची चौकशी केली असता, ते गांजा विकत घेण्यासाठी आरोपीच्या घरी आले होते. त्यांनाही ताब्यात घेतले गेले.

आरोपींकडून चार भ्रमणध्वनी, एक चारचाकी वाहन व गांजा असा एकूण 10 लाख 41 हजार 220 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी राजुरा पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे, पोलिस उपनिरीक्षक संदीप कापडे, पद्माकर भोयर, नितीन जाधव, राजेंद्र खनके, पंडित वर्‍हाडे, राजकुमार देशपांडे, मिलिंद चव्हाण, जमिर पठाण यांनी केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.