Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बलात्कार झाल्याची फिर्याद दिल्यानंतर साक्ष फिरवल्याने एका महिलेला दोन महिने कारावासाची शिक्षा

पतीच्या मित्राला केला होता बलात्काराचा आरोप मात्र कोर्टात साक्षी फिरवली.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

बुलढाणा 23 फेब्रुवारी :- बुलढाणा जिल्ह्यात पतीच्या मित्रावर बलात्काराचा खोटा आरोप लावणाऱ्या फिर्यादी महिलेने कोर्टात साक्ष फिरवल्याने बुलढाणा जिल्हा सत्र न्यायालयाने या महिलेला दोन महीले कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात येणाऱ्या अमडापुर पोलिसात एका 27 वर्षीय महिलेने तिच्या पतीच्या मित्रावर बलात्काराचा आरोप करत खोटा गुन्हा दाखल केला होता.

मात्र कोर्टामध्ये सुनावणी दरम्यान या महिलेने आपली साक्ष फिरवली आणि बलात्कार झालाच नसल्याचं सांगितल.. त्यामुळे या महिलेने पतीच्याच मित्रावर खोटा बलात्काराचा आरोप लावल्याच कोर्टात सिद्ध झालं, त्यामुळे कोर्टात साक्ष फिरवल्याने न्यायालयाचा वेळ वाया घातल्याबद्दल या महिलेला कोर्टाने दणका देत दोन महिन्याचे कारवासाची शिक्षा आणि पाचशे रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे महिलांसाठी असलेल्या कायद्यांचा गैरवापर करणाऱ्या या महिलेला कोर्टाने चांगलाच दणका दिला असल्याचं बोललं जातंय.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.