Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर अश्लील व्हिडिओ अपलोड केल्याने अटक

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सोलापूर : सोशल मिडियावर अश्‍लिल चाईल्ड प्रोर्नोग्राफीचा व्हिडिओ अपलोड करणाऱ्याला सोलापूर शहर पोलिसांनी अटक केली आहे.

मनिष विजयराज बंकापुर असे अटक केलेल्या २३ वर्षीय तरूणाचे नाव आहे. तो सध्या इलेकट्रोनिक्स अभियांत्रिकीच शिक्षण घेत असून सोलापूर पोलिसांना महाराष्ट्र सायबर वर्ल्ड ट्रेड सेंटरकडून त्यासंबंधीच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्याच आधारावर पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे, उपायुक्‍त बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली या तरूणाचा शोध घेऊन त्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सध्या देशभरात कोरोनाचे संकट असल्याने माध्यमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. सर्व मुलांकडे पालकांनी ऑनलाईन शिक्षणासाठी मुलांच्या अपेक्षेप्रमाणे मोबाईल, लॅपटाप घेऊन देत असल्याने शिक्षणाच्या आड अश्लील पोर्न व्हिडिओ च्या साईटही ओपन करून शिक्षणाकडे दुर्लक्ष होतांना अनेकदा उघडकीस आले आहे. त्यातच इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने पोर्न व्हिडिओ पाहून इंस्टाग्रामवर अपलोड केल्याने सायबर अॅक्ट अंतर्गत गुन्ह्याची नोंद करून पोलिसांनी अटक करण्यात आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नदीच्या पात्रात पडलेल्या कुटुंबाला वाचवणाऱ्याचाच नदीत बुडून मृत्यू

 

देशात 26/11 सारख्याच दहशतवादी हल्ल्याची शक्यता!

दिलासादायक ! नव्या कोरोना रुग्णांची संख्या एक लाखापेक्षा कमी

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.