Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

EXCLUSIVE पाहा समृध्दी चे वीज चोर कंत्राटदार. समृध्दी महामार्गाच्या कामासाठी कंत्राटदारांकडून विजेची चोरी.

Get real time updates directly on you device, subscribe now.

महावितरणच्या कारवाईत ६००० युनिटची वीजचोरी उघड.

समृध्दी महामार्ग कंत्राटदारांच्या मनमानीकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री लक्ष देणार का ?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शहापूर/ठाणे, दि. ८ डिसेंबर: समृध्दी महामार्गाची कामे करण्यासाठी नेमलेल्या कंत्राटदारांकडून राजरोसपणे वीज चोरी होत असल्याचे महावितरणच्या कारवाईत उघड झाले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

ठाणे जिल्ह्यातल्या शहापुर तालुक्यातील लेनाड गावाजवळ समृध्दी महामार्गाच्या कंत्रादारांकडून विद्युत मिटर न घेता थेट आकडा टाकून अनधिकृतपणें वीज जोडणी घेतल्याचे आढळले.

यावेळी एकूण ३ ठिकाणी विजेचा अनधिकृत वापर सुरु असल्याचे आढळून आले आहे. महावितरणच्या भरारी पथकाने सदर कारवाई केली असून त्यामध्ये सरासरी ६००० युनिटची वीजचोरी पकडण्यात आली आहे. वीजचोरीकरणाऱ्या व्यक्तीस वीज कायदा-२००३ चे कलम १३५ व १२६ नुसार तीन वर्षांपर्यंतचा कारावास तसेच दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे महावितरण या समृध्दी महामर्गाच्या कंत्राटदारांवर नेमकी काय कारवाई करणार हे पाहणी महत्वाचे ठरणार आहे.


सदर मोहिमेत कल्याण परिमंडळ येथील उपव्यवस्थापक. श्री पाडवी , शहापूर उपविभागातील सहाय्यक लेखापाल श्री. विशाल सानप व कनिष्ठ तंत्रज्ञ श्री. किरण वेखंडे उपस्तिथ होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.