Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

“या” बिल्डरच्या बॉडिगार्ड्सकडून शेतकऱ्याला बेदम मारहाण

बिल्डर मनोजकुमार सिंग व बॉडिगार्ड्सविरुद्ध गुन्हा दाखल, बिल्डर मनोजकुमार सिंगला भाईगिरी आली अंगाशी.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

पनवेल, दि. ३ फेब्रुवारी : मे.अमन डेव्हलपर्सचे मालक मनोजकुमार सिंग या बिल्डरच्या बॉडिगार्ड्सने शेतकरी उद्देश टेंबे यांना जबरदस्तीने गाडीत टाकून अपहरण करून ऑफिसला नेऊन हॉकी स्टिक व फावड्याच्या दांड्याने जबरदस्त मारहाण केल्याची घटना घडली आहे.

सदर डेव्हलपर हा बिल्डींगचे काम लवकरात लवकर पूर्ण करीत नाही, व करारामध्ये ठरल्याप्रमाणे बांधकाम पूर्ण न केल्यास द्यायचे भाडे सुद्धा देत नाही. याबाबत सतत विचारणा करण्यासाठी बांधकामाच्या ठिकाणी गेल्याचा राग मनात धरून बिल्डर आणि त्याच्या बॉडिगार्ड्सने जबरदस्तीने गाडीत भरून ऑफिसला नेऊन बेदम मारहाण केल्याचे फिर्यादी उद्देश टेंबे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या गुन्ह्याची नोंद न्हावशेवा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून बिल्डर मनोजकुमार सिंग याने माझ्या सासऱ्यांसह अनेक गरीब शेतकऱ्यांना फसविले असून त्याची कसून चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी व आम्हा गरीब शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी उद्देश टेंबे यांनी केली आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

रानटी डुक्करची शिकार करणारे दोन आरोपी गजाआड

शेंडीच्या डोंगरावर चढलेल्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू तर एक जखमी

मराठी चित्रपटसृष्टीतील देखणा तारा निखळला

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.