Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्ह्यात कोरोनाने एका महिलेचा मृत्यू, नवीन 158 कोरोनाबाधित तर 327 कोरोनामुक्त 

उच्च रक्तदाब व एनीमीया आजाराने ग्रस्त असलेल्या महिलेचा कोविडने झाला मृत्यू.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. ३ फेब्रुवारी : आज गडचिरोली जिल्हयात 745 कोरोना तपासण्यांपैकी 158 नवीन कोरोना बाधित आढळले असून तब्बल 327 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 35280 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 33461 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 1058 झाली आहे.

आज नविन मृत्यूमध्ये चंद्रपूर जिल्हयातील सावली तालुक्यातील 25 वर्षीय महिलेचा ( हायपोयारॉइडिजम व एनीमीया आजाराने ग्रस्त) समावेश आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 761 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.84 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 3.00 टक्के तर मृत्यू दर 2.16 टक्के झाला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 59,अहेरी तालुक्यातील 28,आरमोरी तालुक्यातील 01, भामरागड तालुक्यातील 10, चामोर्शी तालुक्यातील 32, धानोरा तालुक्यातील 05, एटापल्ली तालुक्यातील 02, मुलचेरा तालुक्यातील 04, कोरची तालुक्यातील 03, कुरखेडा तालुक्यातील 12,सिरोंचा तालुक्यातील 08, आणि वडसा तालुक्यातील 11 जणाचा समावेश आहे.

तर आज कोरोनामुक्त झालेल्या 327 रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील 69, अहेरी तालुक्यातील 32, आरमोरी तालुक्यातील 15, भामरागड तालुक्यातील 01, एटापल्ली तालुक्यातील 17, सिरोंचा तालुक्यातील 03, कोरची तातील 01, कुरखेडा तालुक्यातील 13, चामोर्शी तालुक्यातील 126, धानोरा तालुक्यातील 20, आणि वडसा तालुक्यातील 20 जणाचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

“या” बिल्डरच्या बॉडिगार्ड्सकडून शेतकऱ्याला बेदम मारहाण

रानटी डुक्करची शिकार करणारे दोन आरोपी गजाआड

मराठी चित्रपटसृष्टीतील देखणा तारा निखळला

 

Comments are closed.