Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धकादायक:-एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या

तिघांचं वय दहा वर्षापेक्षाही कमी, उत्तर प्रदेशमधील अयोध्येतील इनायतनगर येथील घटना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

लखनऊ 23 मे :- अयोध्येतील इनायतनगर हृदयद्रावक घटना समोर आली आहे. यात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्याकरण्यात आली आहे. यातील तिघांचं वय दहा वर्षापेक्षाही कमी होतं. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, ही हत्या नेमकी कोणी केली, याचा शोध घेण्यात पोलिसांना अद्याप यश आलेलं नाही. हे प्रकरण उत्तर प्रदेशमधील अयोध्येतील इनायतनगर ठाण्याच्या क्षेत्रातील आहे.

या घटनेच एकाच कुटुंबातील पाच जणांची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली आहे. यात पती-पत्नी आणि तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. या तिघांमधील दोन मुलं तर एक मुलगी आहे. या तिघांचंही वय दहा वर्षापेक्षा कमी आहे. असा अंदाज लावला जात आहे, की मालमत्तेच्या वादवरुन ही हत्या झाली आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत. ही हत्या करण्यात किती जणांचा समावेश होता, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :- ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार अटकेत; हत्येच्या गुन्ह्यात फरार होता

Comments are closed.