Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अवैध दारु वाहतूक करणाऱ्यावर पोलिसांची धडक कारवाई, देशी, विदेशी दारुसह दोन डस्टर कार असा एकुण 16 लाख 50 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

राजस्थान येथील दोन संशयित ताब्यात.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

धुळे : व्हिआयपी वाहनांमध्ये सुरु असलेल्या अवैध व्यवसाय रात्रीच्या सुमारास पोलीसांनी उघडकीस आणला आहे. या कारवाईत निसान कंपनीचे दोन डस्टर वाहन पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्यातील अवैध दारु देखील जप्त करण्यात आली आहेत.

पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सा. पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांना गोपणीय माहिती प्राप्त झाली होती. त्या माहितीच्या अधारे सा.पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांच्यासह पथकाने रात्री 2 ते 3:30 वाजेच्या सुमारास पिंपळनेर ते सटाणा रस्त्यावर दोन वाहनांचा तपास सुरु केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी शेलबारी गाव शिवारातील देवनारायण हॉटेल जवळ रोडच्या बाजुला जी. जे 05 जेएफ 3465 व जीजे 21 ए एच 9390 या दोन निसान कंपनीच्या डस्टर चारचाकी कार दिसून आल्या. पोलिस येत असल्याचे बघुन दोन्ही वाहन चालकांनी वाहने पळविण्याचा प्रयत्न केला. लगेच पोलीसांनी पाठलाग सुरु केला अचानक समोर मोठे वाहने असल्याने अडथळा निर्माण झाल्याने दोन्ही चालकांनी वाहने रस्त्यात उभे सोडून आंधारत पळ काढला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मात्र ज्या स्त्याकडे पळाले तेथे रस्त्याचे काम सुरु असल्याने दोघेही खाली पडले. पोलीसांनी अखेर द़ोघांना ताब्यात घेतले. नाव विचारले असता विरेंद्रसिह गिरधारीसिंह राठोड व जितेंद्रसिंह गिरधारीसिंह राठोड दोघेही राहणार दहिमथा जि.भिलवाडा राजस्थान असे सांगितले.

पोलीसांनी दोघांना ताब्यात घेऊन वाहनाची तपासणी केली असता वाहनाधून दोन लाख किंमतीचे देशी विदेशी दारुसह 14 लाख 50 किंमतीचे दोन डस्टर कार असा एकुण 16 लाख 50 हजाराचा मुद्देमाल पिंपळनेर पोलिसांनी जप्त केला आहे.

सदर कारवाई पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सा.पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांच्यासह वळवी,महाजन,भुषण वाघ,पंकज वाघ सुर्यवंशी व फिर्यादी ग्यानसिंग पावला आदींनी कारवाई केली आहे.

हे देखील वाचा : 

मोठी बातमी: रायगडमध्ये भीषण दुर्घटना, दरड कोसळून तब्बल ३६ जणांचा मृत्यू

३० हजार रूपयांची लाच घेतांना तहसीलदारांना रंगेहात केली अटक; एसीबी ची कारवाई

मोठी बातमी : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर ९९ वर्षांनी नाशिकचा सुपुत्र झाला बॅरिस्टर

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.