Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार खुनाच्या आरोपानंतर फरार

4 मे रोजी हरियाणच्या सोनीपतमध्ये राहणाऱ्या सागर राणाचा मृत्यू आरोपी आहे

दिल्ली डेस्क 18 मे:-   4 मे रोजी दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियममध्ये पैलवानांच्या दोन गटांत खडाजंगी उडाली होती. त्यात हरियाणच्या सोनीपतमध्ये राहणाऱ्या सागर राणाचा मृत्यू झाला होता. हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार याला फरार घोषित केलं असून त्याचा पत्ता सांगणाऱ्याला एक लाख रुपयांचं इनाम जाहीर केलं आहे.

सागर राणा

दिल्ली पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर सुशील कुमार आणि त्याच्या साथीदारांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल केला होता. पण सुशीलचा तपास लागत नसल्यानं आता त्याला पकडून देणाऱ्यास इनाम जाहीर केलं आहे. तसंच आणखी एक आरोपी अजयही फरार असून. त्याच्यावर 50 हजार रुपयांचं इनाम जाहीर झालं आहे. सागर राणा हरियाणाच्या सोनीपतचा राहणारा होता. दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियममध्ये पैलवानांच्या दोन गटांमध्ये झटापट झाली आणि त्यात सागर राणाचा मृत्यू झाला. पैलवान सुशील कुमार आणि त्याच्या सोबत्यांचा यात हात असल्याचं दिल्ली पोलिसांच्या प्राथमिक तपासात आढळल्याचं FIR मध्ये म्हटलंय.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.