Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! आईने आपल्या 13 वर्षीय मुलीला परपुरुषाशी ठेवायला लावले शरीरसंबंध

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

वृत्तसंस्था, दि. १८ सप्टेंबर : आईने आपल्या १३ वर्षीय मुलीला परपुरुषाशी शरीरसंबंध ठेवायला भाग पाडल्याची धक्कादायक घटना राहाता तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी आई आणि ५२ वर्षीय नराधमाविरोधात राहाता पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी आई आणि अत्याचार करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे.

समाजातील अनिष्ट रूढी-परंपरेचा धाक दाखवत आपल्या पोटच्या १३ वर्षीय मुलीला परपुरुषाशी शरीरसंबंध ठेवण्यास आईने भाग पाडले. आईने धमकावल्याने भेदरलेल्या मुलीने आपल्यावर होणारा अत्याचार सहन केला. मात्र, पुन्हा अत्याचाराचा प्रयत्न केल्यानंतर कशीबशी आपली सोडवणूक करून नातेवाईकांना याबाबत माहिती दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यानंतर मुलीच्या मामेभावाच्या फिर्यादीवरून राहाता पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पीडितेची आई आणि अत्याचार करणारा आबासाहेब भडांगे याला पोलिसांनी अटक केली आहे.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

15 लाखांचं बक्षीस असलेला जहाल नक्षलवादी अखेर जेरबंद; महाराष्ट्र ATS ची मोठी कारवाई

सचिवांना दिलेले अधिकार काढले ! सरकारचा झाला निर्णय 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.