Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक!! फोनवरून शिवीगाळ केली याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या दोन युवकांच्या डोक्यात दगड घालून केला खून!

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटसच्या परिसरात घडली घटना.

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • शिव्या का दिल्या असा जाब विचारायला गेले असता आरोपींनी त्यांना काठ्या व तलवार आणि डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केली.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

पुणे : फोनवरून शिवीगाळ का केली म्हणून जाब विचारायला गेलेल्या दोन युवकांचा  काठ्या, तलवारीने सपासप वार करून डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे. दौंड तालुक्यातील पाटसच्या परिसरातील तामखंडा येथील भानोबा मंदीरा समोर रविवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पसार झाले आहेत. या घटनेमुळे रात्रीपासून पाटस परिसरामध्ये तणावाचे वातावरण आहे.

शिवम संतोष शीतकल (२३) गणेश रमेश माखर (२३) दोघेही रा. पाटस (अंबिकानगर ता.दौंड.) अशी खुन झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी मन्या उर्फ महेश संजय भागवत, महेश टुले दोघे रा.पाटस (तामखंडा ), योगेश शिंदे ( रा. गिरिम ता.दौंड जि.पुणे ),  व इतर चार ते पाच अनोळखी आरोपी पसार झाले आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवम शितकल आणि गणेश माखर यांना मन्या उर्फ महेश संजय भागवत याने फोन करून विनाकारण शिव्या दिल्या. शिव्या का दिल्या असा जाब विचारायला गेले असता आरोपींनी त्यांना काठ्या व तलवार आणि डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केली आहे.

याबाबत अर्जुन संभाजी माखर यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

हे देखील वाचा :

आषाढीवारीच्या अनुषंगाने पंढरपूरसह ९ गावात संचारबंदी; महापूजेसाठी मुख्यमंत्री येणार पंढरपूरला

पोलिस हवालदाराची (वाहनचालकाची) धारदार चाकूने गळा कापून हत्या!

तब्बल ३५ लांखांचा गुटखा जप्त करण्यात पोलिसांनी मिळाले यश

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.