Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक: युवती सेना शहर प्रमुखाची पतीनेच केली चाकूने भोसकून हत्या

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क, 

गडचिरोली,15 सप्टेंबर :   कुरखेडा येथील शिवसेना ठाकरे गटाच्या युवती सेनेची कुरखेडा शहर प्रमुख असलेल्या राहत सय्यद यांची त्यांच्या पतीनेच चाकूने भोसकून निर्घुनपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

गुरुवारी मध्यरात्री दिड वाजताच्या सुमारास या हत्येचा थरार घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. पहाटे ३ वाजताच्या सुमारास राहत यांचे वडील झोपेतून उठल्यानंतर त्यांना राहत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसताच घाबरून आरडाओरड केली आणि एकच खळबळ उडाली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आरोपी तायमिन शेख पत्नी राहत यांची हत्या केल्यानंतर नदीवर जाऊन आंघोळ केली आणि रक्ताने माखलेले कपडे धुतले. तेथून त्याने सरळ पोलिस स्टेशन गाठून पोलिसांना जाऊन हकीकत सांगितली. त्याला लगेच अटक करण्यात आली.

विशेष म्हणजे मृत राहत सय्यद यांचा पती तायमिन शेख याला काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमधल्या रायपूर येथे हरणाची शिंगे विक्री प्रकरणात अटक झाली होती. १५ दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटून आलेला होता. लग्नाआधी तो मुंबईत फुटपाथवर साहित्य विक्रीचे काम करायचा. लग्नानंतर तायमिन आणि राहत हे दाम्पत्य राहतच्या माहेरीच राहात होते. मात्र, या दोघांमध्ये कोणत्या कारणातून वाद झाला, आणि वादाचे रूपांतर हत्येत झाले हे अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून हत्ये मागचे नेमके कोणते कारण होते हे पोलीसांच्या तपासात उघड होणार असून पुढील तपास सुरू आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.