Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

“काय ग विचित्राबाई…” संजना घाडी यांची कविता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क,

मुंबई,15 सप्टेंबर: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या संजना घाडी यांनी आपल्या खुमासदार शैलीमध्ये चित्रा वाघ यांना चांगलेच शाळजोडे हाणले आहेत. पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या असलेल्या चित्रा वाघ भाजपच्या गोटात गेल्यानंतर त्यांनी आपल्या भूमिका कशा बदलल्या, आणि त्यांचे समर्थन करताना त्यांची कशी गीची होते,याबाबत संजना घाडी यांनी अतिशय मार्मिक आणि उपहासात्मक काव्यातून काय म्हटलं आहे हे तुम्हीच वाचा.

काय ग विचित्राबाई, किती वेळ रंग बदलणार तुझ्यात लपलेला सरडा!

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

संजय राठोड पूजाचा हत्यारा आहे म्हणणारी तू,
म्हणालीस त्याला चप्पलेने झोडा,
तो तुमच्या मंत्रिमंडळात मंत्री झाल्यावर,
म्हणतेस इतर खूप विषय आहेत बोलायला,संजय राठोडचा चॅप्टर सोडा,
अग विचित्राबाई किती- किती वेळ रंग बदलणार तुझ्यात लपलेला सरडा!
तूच म्हणाली होतीस ना,
ही शिवशाही नाही मोगलाई आहे…
नैतिकता म्हणून धनंजय मुंडेनी मंत्रीपद सोडा,
तुमच्या मंत्रिमंडळात मंत्री झाल्यावर म्हणतेस, अहो, कृषी मंत्री तुम्ही साप म्हणून भुईला झोडा,
अग विचित्राबाई किती किती वेळ रंग बदलणार तुझ्यात लपलेला सरडा!
“हेमामालिनीच्या गालासारखे रस्ते”म्हणणाऱ्या गुलाब पाटलाला म्हणालीस, महिलांचे गाल बघणाऱ्याचे गालच फोडा,
तुमच्या अलीबाबाच्या गॅंगमध्ये गुलाब पाटील सामील होताच म्हणतेस, प्रश्न विचारणारे पत्रकार सुपारी बाज,
असल्या पत्रकारांना बोलावू नका म्हणत बडबडलीस भडाभडा,
अग विचित्राबाई किती किती वेळ रंग बदलणार तुझ्यात लपलेला सरडा!
सायनच्या त्या बलात्कार प्रकरणावर अश्रू गाळले होते तुम्ही,
मणिपूर ची महिलांची नग्न थिंड,महिला कुस्ती पटू चे लैंगिक शोषण,हॉस्टेल आणि रेल्वेतील बलात्कार यावर का नाही केलात थैथयाट थोडा,
अग वीचित्राबाई किती किती वेळ रंग बदलणार तुझ्यात लपलेला सरडा!
काल तुमची पत्रकार परिषद पाहिली,
तुमच्या देवेन भाऊंना असं मागे उभे करून आपण बसून बोलणे बरं नव्हे ताई,
तोल सांभाळा थोडा…
काल आपण दोघेच होतात वाटतं ,
जरा अष्टप्रधानानंपैकी किरीट, राणे,शेलार, भातखळ्या,गोप्या,कदम यांनाही त्याच विदुषकांच्या वेशभूषेत सोडा,
अग विचित्र बाई किती वेळ रंग बदलणार तुझ्यात लपलेला सरडा!
विचीत्राबाई कसं काय झोंबले ना…
बाई, प्रत्येकाचा नेता प्रत्येकाला असतो प्यारा,
सांगते हात जोडून,
सांगायला लावू नका – कार्यकर्त्यांनो तुम्हीही हात सोडा,
त्याकरता तुमच्यासह या जोकरानाही लगाम घाला थोडा…..
अग विचीत्राबाई किती वेळ रंग बदलणार तुझ्यात लपलेला सरडा!

सौ.संजना सं. घाडी
उपनेता आणि प्रवक्ता
शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.