Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ST Bus Accident: ट्रक आणि बस यांची समोरासमोर धडक, चालकासह १५ प्रवाशी जखमी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

पालघर, दि. १८ ऑगस्ट : बोईसर भुसावळ बसचा वाणगाव जवळील साखरे घाटात संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात चालकासह १५ प्रवाशी जखमी झाले आहेत. भुसावळ वरून बोईसर बस आगारात येणाऱ्या बसला अपघात झाला आहे . 

साखरे घाटात रस्ता अरुंद असून, अपघाती वळण असल्याने तसेच, दोन्ही वाहनांच्या चालकांना अंदाज न आल्याने ट्रक आणि बसची समोरासमोर धडक झाली. अपघातातील जखमींवर वाणगाव आणि ऐना रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रक आणि बस यांची समोरासमोर झालेली धडक भीषण असली तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

मृत्यूचा तांडव करणारा नरभक्षक वाघ अखेर जेरबंद..

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.