Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जन्मदात्या आईनेच पोटच्या नवजात मुलीची गळा आवळून केली हत्या

पालघरमध्ये मातृत्वाला काळिमा फासणारी घटना उघडकीस

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क,

पालघर, १5 सप्टेंबर: पालघर जवळील घिवली गावात मातृत्वाला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तिसरी मुलगी झाली म्हणून एका निर्दयी मातेने आपल्या पाच दिवसांच्या चिमुकलीचा गळा आवळून हत्या केली, तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी या निर्दयी मातेने चिमुकलीचा मृतदेह नदीत फेकून दिला आहे. याप्रकरणी तारापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने तिची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.

घिवली गावात राहणाऱ्या श्रेया प्रभू या ३२ वर्षीय महिलेला पहिली मुलगी आणि दुसरा मुलगा असल्याने तिला तिसऱ्यांदाही मुलाचीच अपेक्षा होती. मात्र तिसऱ्यांदा पुन्हा मुलगी झाली. ही मुलगी नको म्हणून या निर्दयी महिलेने रात्री ११.३० वाजताच्या सुमारास सहा दिवसांच्या नवजात चिमुकलीचा स्वतःच्या हाताने गळा दाबून खून केला. दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह एका प्लास्टिक
पिशवी आणि पिवळ्या कुर्त्यात गुंडाळून शाळेच्या बॅगेतभरून तो फेकण्यासाठी सकाळी एसटीने बोईसर रेल्वे स्टेशन आणि तिथून बोईसर ते खार मुंबई येथे माहेरी गेली. परंतु खार येथील घरी कोणीच नसल्याने आणि मृत बाळाला फेकण्यासाठी योग्य ठिकाण न मिळाल्याने पुन्हा बोईसरला
परत आली. सायंकाळी चारच्या सुमारास वानगाव परिसरातील नदीपात्रात तिने बाळाचा मृतदेह फेकला आणि घर गाठले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

परंतु घिवली गावामधील आशा सेविका आणि आरोग्य कर्मचारी हे श्रेया प्रभू हिच्या घरी आई आणि नवजात बाळाची तपासणी करण्यासाठी गेले असता, तिथे बाळ नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी या महिलेने बाळ नातेवाईकांना दिले आहे, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र ही महिला काल बाळnघेऊन गेली होती आणि आज एकटीच परत आली अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली. त्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी याबाबत तारापूर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी या महिलेची कसून चौकशी केली असता तिने मुलीच्या हत्येची कबुली दिली. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात एकच संताप व्यक्त केला जात आहे.

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

https://chat.whatsapp.com/GorVPDcV0YnJ6MkQBN6dzt

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.