आठ दिवसांपूर्वी बनलेला रस्ता चक्क हातानेच उकरला जातोय!
महागाव तालुक्यातील निकृष्ट कामाचा आदर्श नमुना.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
यवतमाळ, दि. २३ जानेवारी : महागाव तालुक्याला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. ती संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. पुन्हा एका रस्त्याची पोलखोल गावकऱ्यांनी केली आहे. दीड कोटी रुपये खर्च करून लेवा ते बारभाई तांडा या रस्त्याचे काम करण्यात आले. या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. अक्षरशा हा रस्ता हातांनी खरडून काढला तरी निघत आहे.
प्राप्त माहितीनुसार, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून अंदाजे १ कोटी ४८ लाख रुपये खर्च करून हा रस्ता बनविण्यात आला आहे. यात ठेकेदाराने मलाई लाटली असल्याचे दिसून येते. स्थानिक युवकांनी एक ते दीड किलोमीटर अंतरा पर्यंत रस्त्याची पाहणी केली. त्यांनी हाताने रस्ता उखडून दाखवत पोलखोल केली. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांना संबंधित विभाग काळ्या यादीत टाकणार का ? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.
हे देखील वाचा :
अल्पवयीन मुलीचं गर्भपात प्रकरण : डॉ. कदम यांच्या घरी पोलिसांनी टाकली धाड!
रक्तदान ही काळाची गरज : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील
[…] […]