Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रक्तदान ही काळाची गरज : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील

रक्तदान शिबीरास आ. चंद्रकांतदादा पाटील यांची सदिच्छा भेट.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

पुणे डेस्क, दि. २३ जानेवारी : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर, रक्ताची गरज पुन्हा निर्माण झाली आहे. त्यामुळे रक्तदान ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि मातोश्री जनाबाई बलभीम मोकाटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रबोधन विचाधाराच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरास आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी आमदार शिवसेना नेते चंद्रकांत मोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, माजी नगरसेवक अॅड. योगेश मोकाटे, भाजपा कोथरुड मंडल अध्यक्ष पुनित जोशी, नवनाथ जाधव, शिवसेनेचे प्रशांत बधे, किरण साळी, नंदू घाटे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आ. पाटील म्हणाले की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत, अनेक रुग्णालयात दाखल रुग्णांवर उपचारासाठी रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याचे वृत्त प्रसार माध्यमांतून येत आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचारासाठी रक्तदान ही काळाची गरज आहे. त्यामुळे आता यासाठी रक्तदात्यांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी काही रक्तदात्यांचे आ. पाटील यांनी अभिनंदन करुन, प्रमाणपत्र ही प्रदान केले.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मंत्री छगन भुजबळ व दादाजी भुसे यांच्याकडून विनम्र अभिवादन

राष्ट्रीय हरित लवादाची चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रावर मोठी कारवाई!

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवेश क्षमतेत वाढ – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

 

 

 

 

 

 

 

Comments are closed.