Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

झुडपी जंगलाबाबत केंद्र शासनास तातडीने प्रस्ताव सादर करा- पशु व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

नागपूर डेस्क, दि. २३ जानेवारी : नागपुर जिल्ह्याचा सर्वांगीण विकासाचा दृष्टीने गिरड येथील दर्गा परिसर महत्वाचा आहे. येथे येणाऱ्या रस्त्याच्या रूंदीकरणात झुडपी जंगल येत असल्याने त्याबाबत स्वयंपूर्ण प्रस्ताव वनविभागाला तातडीने सादर करावा. केंद्र सरकारकडे त्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, अशा सूचना राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.

गिरड ते गिरड दर्गापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरणाच्या प्रस्तावाबाबत विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागपूर महानगर प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता लीना उपाध्ये, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंते सह विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गिरड हे पर्यटन क्षेत्र असून लाखो श्रध्दाळू येथे येतात. पर्यटक व भाविकांना कोणतीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही मंत्री सुनील केदार यांनी सांगितले. वनहक्काबाबत असलेल्या या प्रस्तावास वन विभागाला सोयिस्कर होणार. असे मुद्दे त्यात नमूद करा. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

राष्ट्रीय हरित लवादाची चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रावर मोठी कारवाई!

रक्तदान ही काळाची गरज : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील

नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मंत्री छगन भुजबळ व दादाजी भुसे यांच्याकडून विनम्र अभिवादन

 

 

Comments are closed.