Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘त्या’ दोन अभिनेत्रींना चोरीच्या आरोपाखाली अटक

सावधान इंडिया आणि क्राईम पेट्रोलमध्ये काम करणाऱ्या दोन अभिनेत्रींना चोरीच्या आरोपाखाली मुंबईतील आरे पोलिसांनी अटक केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

मुंबई डेस्क, १८ जून :  ‘क्राईम पेट्रोल’ आणि ‘सावधान इंडिया’ मध्ये काम करणाऱ्या दोन अभिनेत्रींना चोरीच्या आरोपाखाली आरे मुंबईतील पोलिसांनी अटक केली आहे. कोरोना काळात लागलेल्या लॉकडाऊनमुळे हातातलं काम गेलं. डोक्यावरचं छत सुद्धा जाण्याची वेळ आली, त्यावेळी या अभिनेत्री आरेमध्ये त्याच्या मित्राकडे गेल्या होत्या. हा मित्र पेईंग गेस्ट ठेवत असे, तिथे आधीच राहत असलेल्या पेईंग गेस्टचे पैसे यांनीच चोरले असल्याच स्पष्ट झाले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टीव्हीवर लोकांनी गुन्हे कसे केले हे दाखवणाऱ्या दोन अभिनेत्री आज स्वतः एका गुन्ह्यात सहभागी झाल्या आहेत. आरेमधील रॉयल पाम अपार्टमेंटमध्ये १८ मे रोजी या दोन्ही अभिनेत्री आपल्या मित्राकडे जो पेंईग गेस्ट म्हणून लोकांना ठेवत होता त्याच्याकडे राहायला गेल्या. तिथे आधीच एक जण राहत होता. त्याच्या लॉकरमध्ये ठेवलेले ३ लाख २८ हजार रुपये घेऊन या दोघी पसार झाल्या.

अटक करण्यात आलेल्या या दोन्ही अभिनेत्रींची नावे सुरभी श्रीवास्तव (२५) आणि मोसीना शेख (१९) अशी आहेत. लोकांचे गुण हे दाखवता दाखवता या दोघी कधी गुन्हेगार झाल्या ते कळलच नाही. त्यांची चोरी सोसायटीमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचं या दोघींच्या लक्षात आलंच नाही.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आपले पैसे चोरी झाल्यानंतर तक्रारदाराने या दोन मुलींवर संशय व्यक्त करत आरे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला.

सोसायटीमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या दोन्ही अभिनेत्री आपल्या हातात एक बॅग घेऊन जाताना स्पष्ट दिसल्या. ज्यामुळे या दोघींकडे आता लपवण्यासाठी काहीच राहिलं नव्हतं आणि आपला गुन्हा मान्य करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायही नव्हता. कसून चौकशी केल्यानंतर दोघींनी आपला गुन्हा मान्य केला.

हे देखील वाचा

चोरी गेलेल्या ९० मोबाईलचा शोध लावण्यात गडचिरोली सायबर पोलिसांनी मिळविले यश

राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर प्रश्नचिन्ह, गडचिरोली-चामोर्शी मार्गाला अल्पावधीतच तडा

जिल्हा शासकीय रक्तपेढी गडचिरोली कडून मनोज पिपरे यांचा सत्कार

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.