Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर प्रश्नचिन्ह, गडचिरोली-चामोर्शी मार्गाला अल्पावधीतच तडा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : मागील दोन वर्षापासून जिल्ह्यातील चारही मार्गावर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. यात चंद्रपूर, चामोर्शी, आरमोरी, धानोरा या मुख्य मार्गाचा समावेश आहे. चंद्रपूर मार्गाचे काम जवळपास पूर्णत्वास आले असून गडचिरोली-चामोर्शी या मार्गाचे काम सुरु आहे.

सार्वजनीक बांधकाम विभागांतर्गत कंत्राटदारामार्फत सदर रस्त्याचे काम केले जात असताना गडचिरोली-चामोर्शी मार्गावर काही अंशी झालेल्या महामार्गाला अल्पावधीतच तडा गेल्याने महामार्गाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय महामार्गाचे काम जिल्ह्यातील मागील दोन वर्षापासून सुरु आहे. सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या या राष्ट्रीय महामार्गाचे काम संबंधित कंत्राटदारामार्फत केल्या जात आहे.

सद्यस्थितीत चंद्रपूर मार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले असून चामोर्शी मार्गाचे काम सुरु आहे. या महामार्गाच्या कामाच्या संथगतीबाबत नागरीकांसह वाहन धारकांमध्ये कमालीचा संताप व्यक्त होत आहे. दरम्यान चामोर्शी मार्गावरील राष्ट्रीय महामार्गाचे काम काहीअंशी झाले असून अद्याप बरेच काम शिल्लक आहे. मात्र काहीअंधी करण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याला अल्पावधीतच तडा गेल्याचे निदर्शनास येत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यामुळे सदर रस्ता बांधकामाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे. संबंधित कंत्राटदारामार्फत निकृष्ट साहित्याचा वापर केल्या जात असल्यामुळे सदर मार्ग अल्पावधीतच खराब होण्याची दाट शक्यता आहे.

राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी संबंधित विभागावर सोपविण्यात आली आहे. मात्र कंत्राटदारामार्फत मनमर्जीने तसेच निकृष्ट साहित्याचा वापर केल्या जात असतांना याकडे संबंधित विभागाच्या अभियंत्यानी दुर्लक्ष केले असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. अल्पावधीतच राष्ट्रीय महामार्गाला तडे गेल्याने या बांधकामाची कितीपत उच्च दर्जाचे झाले आहे. हा संशोधनाचा विषय ठरला आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या अभियंत्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.

बांधकामाची सखोल चौकशी करा

गडचिरोली-चामोर्शी राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील अनेक दिवसांपासून सुरु आहे. संबंधित विभागाचे मुख्य अभियंता मिश्रा यांच्या देखरेखीखाली काही किमी मार्गाचे काम झाले असून अद्याप अनेक काम शिल्लक आहे. मात्र बांधकाम पूर्ण झालेल्या रस्त्याला अल्पावधीतच तडे गेल्याने संबंधित कंत्राटदाराच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न निर्माण होत आहे. बांधकामात निकृष्ट साहित्याचा वापर होत असल्यानेच रस्त्याचे अल्पावधीतच पितळ उघडे पडले आहे. वेळीच याची दखल न घेतल्यास सदर राष्ट्रीय महामार्ग अल्पावधीतच खराब होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सदर कामाची सखोल चौकशी करुन दोषी कंत्राटदारासह संबंधित अभियंत्यावरही कारवाई करण्याची मागणी जनकल्याण समाजोन्नती अन्याय, भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी केली आहे.

 

हे देखील वाचा 

चोरी गेलेल्या ९० मोबाईलचा शोध लावण्यात गडचिरोली सायबर पोलिसांनी मिळविले यश

नवजात बालकांची श्रवण शक्ती तपासण्यासाठी मोबाईल युनिट चावापर पुणे, गडचिरोली आणि जालना येथे प्रायोगिक तत्वावर प्रकल्प राबविणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

Comments are closed.