Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘ति’ला मिळाले दहावीच्या परीक्षेत ६७ %गुण..मात्र निकाल बघण्या आधीच नराधमांनी घेतला ‘ति’चा जीव..

दोन नराधमांना अटक...

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोक स्पर्श न्युज नेटवर्क.

जव्हार प्रतिनिधी/ दि.१९ जून:

पालघर जिल्ह्यातल्या जव्हारमधील वडपाडा गावातील बेपत्ता झालेल्या आणि संशयास्पदरित्या मृतदेह आढळलेल्या त्या दुर्दैवी विद्यार्थिनीला दहावीच्या परीक्षेत ६७ %गुण मिळाले आहेत.  परंतु परीक्षेचा निकाल बघण्या आधीच नराधमांनी या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून, अतिशय निर्दयीपणे दगडाने ठेचून तिची हत्या केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर अल्पवयीन मुलगी ही आदिवासी समाजाची असून तिने यंदा दहावीची परीक्षा दिली होती. दिनांक १४ जून पासून ही १६ वर्षीय मुलगी अचानक बेपत्ता झाली होती, या प्रकरणी तिच्या पालकांनी जव्हार पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. परंतु   या मुलीचा दुसऱ्या दिवशी सायंकाळी संशयास्पदरित्या मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सदर मृतदेहाच्या अंगावर आणि डोक्यावर जखमा असल्याचे दिसून आले आहे. तसेच तिच्यावर बलात्कारही झाल्याचाही संशय व्यक्त केला होत आहे. त्यामुळे यामुळे मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून आता शवविच्छेदन अहवालात तिच्यावरील अत्याचाराचा, तसेच इतर गोष्टींचा खुलासा होणार आहे. या प्रकरणी पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे तातडीने फिरवून दोन संशयितांना जेरबंद केले आहे. तसेच त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली आहे. 

पालघर जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. शहरी भागात हे प्रमाण जास्त असेल तरी, आता ग्रामीण भागात देखील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे.  त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झाले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.