Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रुग्णालयाच्या समोरच तरुणांनी केला डॉक्टरावर बेछुट गोळीबार!

यवतमाळमधील उमरखेड येथील उत्तरवार रुग्णालयाच्या परिसरातील घटना. या घटनेने हादरलं यवतमाळ.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

यवतमाळ, ११ जानेवारी : यवतमाळमधील उमरखेड येथील उत्तरवार रुग्णालयाच्या परिसरात दोन तरुणांनी चक्क डॉक्टरावरच बेछुट गोळीबार केल्याची  घटना आज संध्याकाळी घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, हनुमंत धर्मकारे असं हल्ला झालेल्या डॉक्टराचं नाव आहे. या गोळीबारामुळे धर्मकारे जखमी झाले आहे, त्यांना याच रुग्णालयात दाखल केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हनुमंत धर्मकारे हे दुपारी रुग्णालयातून घरी निघाले होते. रुग्णालयाच्या परिसरात आले असता अचानक दोन तरुण दुचाकीवर आले आणि त्यांनी धर्मकारे यांच्यावर बेछुट गोळीबार केला.  रुग्णालयाच्या समोरच डॉक्टर धर्मकारे यांच्यावर गोळीबार झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. डॉक्टर धर्मकारे यांच्यावर का आणि कशासाठी गोळीबार केला, याचा तपास पोलीस करत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या प्रकरणी दोन अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हल्लेखोरांना पकडण्यासाठी शहरात नाकाबंदी करण्यात आली आहे.

हे देखील वाचा : 

प्रवासी जनतेची गैरसोय टाळण्यासाठी, एसटीच्या भविष्यासाठी… संपकरी कर्मचाऱ्यांनी कामावर यावे…! – शरद पवार यांचे आवाहन

११ बालकाच्या जळीत दुर्घटनेला १ वर्ष पूर्ण…

“या” महिन्यात १० टक्क्यांपर्यंत वाढणार इलेक्ट्रॉनिक्सच्या किमती

 

Comments are closed.