Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्यात शिक्षकांची भुमीका महत्वपुर्ण
:कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी यांचे प्रतिपादन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली:23 फेब्रुवारी

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली भारतीय शिक्षण मडंळ व निती आयोग, भारत सरकार यांच्या संयुक्त
विद्यमाने “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०” या विषयावर व्याख्यानमालेचे विद्यापीठाच्या दशमनोत्सव वर्षानिमित्य नुकतेच आयोजीत करण्यात आले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. श्रीनिवास वरखेडी,कुलगुरू, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, प्रमुख अतीथी म्हणुन डॉ. श्रीराम कावळे, प्र-कुलगुरू, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, डॉ अनिल चिताडे, कुलसचिव गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, डॉ सुरेश रेवतकर,विज्ञान विभागाचे अधिष्ठाता व प्रमुख वक्ते म्हणुन डॉ केशव भंडारकर, माजी प्राचार्य, पुजाभाई पटले कॉलेज ऑफ एज्युकेशन, गोंदिया आणि डॉ. नारायण मेहर, सचिव विदर्भ प्रांत भारतीय शिक्षण मंडळ आदीची. उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रास्तावीकात विद्यापीठाचे कुलसचिव, डॉ अनिल चिताडे, म्हणाले, शिक्षक हा खऱ्या अर्थाने
महत्वाचा दुवा आहे. शिक्षकांची भुमीका कशी असावी या विषयी विद्यापीठाचे कुलगुरू, प्रा. श्रीनिवास वरखेडी, नेहमीच आम्हाला प्रेरणा देत असतात. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करतांना गोंडवानाविद्यापीठाची वाटचाल आणि भुमीका फार महत्वाची आहे. यावेळी सचिव, विदर्भ प्रांत भारतीय शिक्षण मडंळ डॉ नारायण मेहर, म्हणाले शासनाने तयार केलेली शिक्षण विषय धोरण ही चागंली असून त्यांचा उपयोग
शिक्षणासाठी निश्चितच होईल, आपले शिक्षण हे गुणवत्तेवर विशेष भर देणारे आहे. जागतीक स्पर्धेत
विद्याथ्यांनी टिकावे आणि मोलाचे कार्य पार पाडावे यासाठी शिक्षकांची भूमिका फार महत्वाची आहे.
देशभरातील सर्व विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करून त्यांची अंमलबजावणी करावी असे आवाहन केले.
अध्यक्ष स्थानावरून बोलतांना विद्यापीठाचे मा. कुलगुरू, प्रा. श्रीनिवास वरखेडी म्हणाले राष्ट्रीय शिक्षण धोरण हा विषय अतिशय महत्वाचा असून शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे. शिक्षकामुळेच विद्यार्थी प्रेरीत होत
असतात आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतित मोलाची भर पडत असते. या व्याख्यान मालेचे प्रमुख वक्ते माजी प्राचार्य, पुंजाभाई पटेल, कॉलेज ऑफ एज्युकेशन गोंदीया डॉ. केशव भंडारकर म्हणाले, शिक्षक हा असा दुवा
आहे जो एका पीढी पासून दुसऱ्या पीढी पर्यत आपले ज्ञान संक्रमीत करीत असतो भारताचे भविष्य हे
विद्यार्थ्यांच्या हाती आहे. भारतातला प्रत्येक नागरीक कुठल्या ना कुठल्या गुरूचा शिष्य आहे. म्हणूनच येथीलविद्यार्थ्यांचा विकास हा चांगल्या प्रकारे होवू शकतो. विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती म्हणजे प्राध्यापकाचा विजय
आहे. आपल्या ज्ञानाने समोरच्या दिपेला दिपवून टाकले पाहीजे ज्ञानाच्या प्रकाशाने प्रगतीचा मार्ग सुकर होतो.
हजारो प्राथमिक शिक्षक आहेत जे माझ्या संर्पकात आहेत रंजीतसिंग डिस्ले, यांना नुकताच ग्लोबल टिचर
अवार्ड मिळाला. आदर्श शिक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्याच्यापासून अनेक शिक्षकांना प्रेरणा घेता येईल
या कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी लाभ घेतला कार्यक्रमाचे संचालन डॉ. रजनी वाढई यांनी तर आभार
डॉ. विवेक जोशी, संयोजक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी समिती यांनी मानले. हा कार्यक्रम आभासी
पध्दतीने पार पडला

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.