Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कलाविश्वाला मोठा धक्का; प्रसिद्ध दिग्दर्शक के विश्वनाथ यांचं निधन

के विश्वनाथ यांनी वयाच्या ९५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

हैदराबाद  3 फेब्रुवारी :- तेलुगू आणि हिंदी सिनेविश्वातून एक अत्यंत वाईट बातमी समोर येत आहे. दिग्गज दिग्दर्शक के विश्वनाथ  यांचं निधन झालं आहे. के विश्वनाथ यांनी वयाच्या ९५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबाद मधील रुग्णालयात उपचार सुरु होते. पाच राष्ट्रीय पुरस्कार विजेते विश्वनाथ यांनी त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. के विश्वनाथ हे वयाशी संबंधित समस्यांशी लढत होते. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी दुःख व्यक्त केलं. अनेकांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. सध्या सर्वत्र त्यांच्या निधनानंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.

विश्वनाथ यांनी 1957 मध्ये ‘तोडीकोडल्लू’ चित्रपटासाठी ऑडिओग्राफर म्हणून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. त्या चित्रपटादरम्यान त्यांच्या कामाची दखल घेतलेल्या दिग्दर्शक अदुर्थी सुब्बाराव यांनी विश्वनाथ यांना सहाय्यक दिग्दर्शक म्हणून संधी दिली. विश्वनाथ यांनी अक्किनेनी यांच्या ‘इदारुमित्रुलु’, ‘चादुवाक्वाना टेट्रिलू’, ‘मूगामनसुलु’ आणि ‘डॉक्टर चक्रवर्ती’ सारख्या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केल आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

के. विश्वनाथ यांनी ‘आत्मा गोवरवम’ सिनेमातून दिग्दर्शक म्हणून कलाविश्वात पदार्पण केलं. ‘आत्मा गोवरवम’ सिनेमासाठी के. विश्वनाथ यांना बेस्ट फिचर फिल्मसाठी नांदी पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं. ‘शंकरभरणम’ सिनेमाच्या यशानंतर त्यांना प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणून ओळखू जावू लागलं. आज देखील त्यांच्या कामाचं सर्वत्र कौतुक केलं जातं.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

के विश्वनाथ यांना आपल्या कारकिर्दीत प्रचंड पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, पाच वेळा राष्ट्रीय पुरस्कार तसेच पदमश्री पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

हे पण वाचा :-

 

Comments are closed.