Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी “आमचा वेगळा विदर्भ झाला पाहिजे” घोषणा

तीन कार्यकर्ते ताब्यात.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

वर्धा 3 फेब्रुवारी :- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरु असताना शुक्रवारी गोंधळ झाला. विदर्भवाद्यांनी घातलेल्या गोंधळामुळे मुख्यमंत्र्यांच्या भाषणात अडथळे आले. यावेळी पोलिसांनी घोषणा देणाऱ्या तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. आमचा वेगळा विदर्भ झाला पाहिजे, अशा घोषणा आंदोलक देत होते. मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. त्यानंतर त्यांचं भाषण सुरू असतानाच विदर्भवाद्यांनी वेगळा विदर्भच्या घोषणा देण्यास सुरुवात केली.

मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु असताना आंदोलक स्वतंत्र विदर्भाच्या घोषणा देत काही कागदे फडली. पोलिसांनी घोषणा देणाऱ्यांना त्वरीत ताब्यात घेतले. त्यात महिला आंदोलकही म्हणाली, आम्हाला वेगळा विदर्भ पाहिजे. विदर्भात बेरोजगारी वाढली आहे. यामुळे आमची मुले नैराश्यातून व्यसनाधीन झाली आहेत. ते दारु पितात, गांजा पितात. त्यांच्या भविष्यासाठी आम्हाला वेगळा विदर्भ पाहिजे.परंतु पोलिस आवाज दाबण्याचा प्रयत्न करताय. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार कोण? असा प्रश्न त्या आंदोलकाने उपस्थित केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. आपण त्यांचे म्हणणे ऐकून घेऊ. विदर्भात सुरु असलेले हे साहित्य संमेलन आहे. तुमचे विषय मांडायला वेगवेगळे व्यासपीठ आहे. यासाठी सरकारची दारे २४ तास उघडी आहेत. कुणाचाही अनादर करण्याचा आमचा हेतू नाही. परंतु आज हे साहित्यिकांचे राज्य आहे, कृपया तुम्ही गोंधळ घालू नका असे ते मानले.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.