Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

प्रसिद्ध गायक सरदूल सिकंदर यांचं कोरोनामुळे निधन

पंजाबमधील प्रसिद्ध गायक सरदूल सिकंदर यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई 24 फेब्रुवारी:- पंजाबमधील प्रसिद्ध गायक सरदूल सिकंदर यांचं निधन झालं आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती आहे. गेले अनेक दिवस ते दवाखान्यात दाखल होते. त्यांनी मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. मूत्रपिंडाच्या समस्येमुळे त्यांना महिनाभरापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचीही माहिती आहे.त्यावेळी त्यांचं ऑपरेशन यशस्वी झालं, मात्र त्यादरम्यान त्यांना कोरोनाचं इन्फेक्शन झालं आणि यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनीही सरदुल सिकंदर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे- “महान पंजाबी गायक सरदूल सिकंदर यांच्या निधनाबद्दल कळल्यावर फार वाईट आहे. नुकतंच तो कोविड 19 चा शिकार झाला  होता आणि त्याच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या कुटुंबियांबद्दल आणि चाहत्यांविषयी माझे मनःपूर्वक संवेदना.”

सरदूल सिकंदर हे एक पंजाबी गायक होते. 1980च्या दशकात सरदूल यांनी आपला पहिला अल्बम “रोडवेज द लारी” जारी केला होता. यानंतर, त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. सरदूल सिकंदर यांनी अनेक हिट गाणी दिली आहे. याशिवाय त्यांनी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची झलक दिली आहे. ऑगस्ट 1961 रोजी त्यांचा जन्म झाला. सरदूल सिकंदर यांनी “जग्गा डाकुरा” या पंजाबी चित्रपटात आपल्या धमाकेदार अभिनयानं सर्वांना प्रभावित केलं.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.