Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

समंथा रूथ प्रभूचा ‘यशोदा’चा बाॅक्स ऑफिसवर धुमाकूळ

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 15 नोव्हेंबर :-   दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द अभिनेत्री समंथा रूथ प्रभूचा ‘यशोदा’ हा चित्रपट सध्या बाॅक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाचे कथानक सरोगसी घोटाळ्यावर आधारित आहे. हा चित्रपट रिलीज होउन चार दिवस झाले असून ओपनिंग डेला दहा कोटी पेक्षा जास्त कमाई या चित्रपटाने केली आहे.

फक्त देशभरातीलच नाही तर परदेशातील सिनेमागृहात देखील ‘यशोदा’ हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाच्या कथानकाला आणि चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. अमेरिकेमध्ये या चित्रपटाने 145 K डाॅलर्सपेक्षा जास्त कमाई केली आहे तर भारतात ‘यशोदा’ चित्रपटाने 12 कोटीची कमाई केली आहे. समंथाचा ‘यशोदा’ हा पहिला पॅन इंडिया चित्रपट आहे. हा चित्रपट पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला. तमिळ, मल्याळम, कन्नड, तेलुगू आणि हिंदी या भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

चित्रपटात समंथाने एका सरोगेट मदरची भुमिका साकारली आहे. जी वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सुरू असलेला घोटाळा उघडकीस आणते. या चित्रपटात समंथासोबत वरलक्ष्मी सरथकुमार, उन्नी मुकुंदन, राव रमेश, मुरली शर्मा, संपत राज, शत्रु, मधुरिमा, दिव्या श्रीपदा या कलाकारांनी देखील प्रमुख भुमिका साकारली आहे.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.