Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मध आणि कच्च्या लसणाचे मिश्रण वजन कमी करण्यास उपयुक्त

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 06 नोव्हेंबर :- वजन कमी करण्याचे अनेक उपाय आहेत. त्यापैकी एक म्हणजे मध आणि कच्चा कसूण एकत्र. खाणे. लसूण आणि मध यांचे मिश्रण वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. सहार वनज कमी करण सोप काम नाही. यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील. त्यांचे वनज जास्त आहे, ते वजन कमी करण्यासाठी अनेक पध्दतींचा अवलंब करतात. यासाठी काही लोक सकाळी रिकाम्यापोटी कोमट पाणी पितात, तर काही डायटिंग करत राहतात. काही लोक जेवण कम करतात. त्यामुळे त्यांना अशक्तपणा जाणवू लागतो. अशा परिस्थितीत मध आणि कच्च्या लसूणचे मिश्रण काही दिवस सकाळी रिकाम्या पोटी सेवन केल्यास वजन कमी करण्यासाठी हा सुरक्षित व आरोग्यदायक घरगुती उपाय आहे. बरेचदा लोक सकाळी रिकाम्या पोटी कच्चा लसूण खातात, त्यामुळे पचनशक्ती सुधारण्यासोबतच शरीराला डिटाॅक्सिफाय करता येते. एवढेच नाही तर उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्राॅल कमी करण्यासाठी लसणाचे आरोग्यदायी फायदेही आहेत.

लसूण शरीरातील उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेराॅलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. यासोबतच रक्त आणि रक्तवाहिन्यांचा प्रवाह सुरळीत ठेवण्यास मदत होते. त्यामुळे रक्त घट्ट होत नाही आणि रक्तवाहिन्या लवचिकही राहतात. मधामध्ये असलेले अटिऑक्सिडंट्स हृदयविकारांपासून बचाव करण्यासही मदत करतात. अल्झायमर आजारामध्ये मध आणि लसणाचे सेवन फायदेशीर ठरते. याशिवाय मध आणि लसणाच्या सेवनाने भ्रण होणे किंवा वेडेपणा सारख्या समस्यांमध्ये देखील आराम मिळतो. त्यात असलेले अटीऑक्सिडंट्स आणि इतर पोषक घटक स्मरणशक्ती, एकाग्रता आणि लक्ष केंद्रीत करण्यास मदत करतात. वाढत्या वयाबरोबर कमी होत जाणारी मानसिक क्षमताही मध आणि लसणाच्या सेवनाने दूर होउ शकते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विषाणूमुळे होणारा खोकला आणि सर्दी बरी करण्यासाठी मधाचा वापर केला जातो. शुध्द मध दुर्मिळ व्हायरल इन्फेक्शनवर देखील फायदेशीर ठरू शकतो. न्यूमोनियासारखा जिवाणू संसर्ग देखील मध आणि लसणासमोर पराभूत होतो. या दोन्हींच्या मिश्रणाने बॅक्टेरियाची वाढ थांबते. अशा प्रकारचे जिवाणू संक्रमण जे सहजासहजी प्रतिजैविकाने बरे होत नाही त्यावरही मध आणि लसणाच्या सेवनाने उपचार केले जाउ शकतात.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.