Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वसई मॅरेथाॅनसाठी पूर्व भागाचा विचार करावा

शिवसेनेची मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वसई, 06 नोव्हेंबर :- दरवर्षी डिसेंबर महिन्यात महापालिकेच्या वतीने मॅरेथाॅन स्पर्धा आयोजित केली जाते. या वर्षी होणार्या मॅरेथाॅनसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. गेली नउ वर्षे मॅरेथाॅन स्पर्धेचा मार्ग पश्चिम पट्टयातून जातो. स्पर्धेचे आयोजन करतांना पूर्व भागाचा विचार केला जात नसल्याने नागरिकांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. म्हणून यावर्षी 11 डिसेंबर रोजी होणार्या मॅरेथाॅन स्पर्धेसाठी पूर्व भागाचा विचार करावा अशी मागणी वसई-नालासोपारा विधानसभा क्षेत्राचे जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी केली आहे.

गेल्या अनेक वर्षापसून वसई-विरार शिवसेनाची पालिका जाते. एथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाने देखील या मॅरेथाॅनला क्रीडा महापालिकेच्या वतीने मॅरेथाॅन आयुक्तांकडे मागणी स्पर्धा म्हणून मान्यता दिली आहे. स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातीलच नाही तर देशभरातील असंख्य नामवंत धावपटू तसेच स्थानिक प्रतिष्ठित नागरिक व महिला सहभागी होणार आहे. ही स्पर्धा आतापर्यंत फक्त पश्चिम पट्टयातून जाते. मात्र यावर्षी वसई-विरारमधील पूर्व भागातून मॅरेथाॅनचा मार्ग न्यावा अशी मागणी शिवसेनेच्यावतीने पालिका आयुक्त अनिलकुमार पवारयांच्या कडे करण्यात आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी पालिका आयुक्त अनिलकुमार पवारयांना पत्र दिले. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट करून त्यांना मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी स्वप्नील बांदेकर, संतोष टेंबुलकर, उत्तम तावडे, जितु शिंदे, भारत देवघरे आदि उपस्थित होते.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.