Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

लम्पीग्रस्त जनावरांसाठी आसान्या फाउंडेशन तर्फे दिला औषधांचा साठा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

यवतमाळ, 06 नोव्हेंबर :- सद्यस्थितीत राज्यातील पशुधन लम्पी या चर्मरोगाच्या आजाराने ग्रस्त आहेत. त्यामुळे शेतकरी ही त्रस्त आहेत. जिल्ह्यात लसीकरणानंतरही लम्पीचा प्रकोप कायम असून आजारी जनावरांवर आवश्यक उपचार करण्याकरीता औषधांचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे आसान्या फाउंडेशनचे डॉ. किशोर बन्सोड यांनी औषधी महावेट यवतमाळचे अध्यक्ष डॉ. चव्हाण यांच्याकडे औषधांचा साठा सुपूर्द केला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्ह्यामध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात दिसत आहे. अशातच लम्पीग्रस्त जनावरांवर आवश्यक उपचार करण्याकरीता औषधी उपलब्ध नाही. त्यामुळे सामाजिक बाधिलकी जोपासत आसान्या फाउंडेशन संस्थेकडून आर्थिकदृष्ट्या दुर्बल पशुपालकांच्या लम्पीग्रस्त जनावरांवर उपचार करण्यास काही महत्वाच्या औषधी फाउंडेशनचे यवतमाळ जिल्हा समन्वयक डॉ.किशोर बन्सोड यांच्या मार्गदर्शनात खरेदी करून महावेट यवतमाळ चे अध्यक्ष डॉ. बी.बी. चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केले.

औषधींचा उपयोग आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या प्शुपालकांच्या लम्पीग्रस्त जनावरांवर करण्याची विनंती फाउंडेशनचे संचालक अतुल देउलकर, आनंद खोब्रागडे, मोनिका निंबेकर यांनी केली आहे. या औषधींमुळे बर्याच लम्पीग्रसत जनावरांच्या उपचाराची सोय होणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.