Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात आज ६९ नवीन कोरोनाबाधित तर ३४ कोरोनामुक्त

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २६ मार्च: जिल्हयात आज ६९ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. तसेच ३४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित १०३९७ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या ९८६२ वर पोहचली. तसेच सद्या ४२६ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण १०९ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.८५ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण ४.१० टक्के तर मृत्यू दर १.०५ टक्के झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नवीन ६९ बाधितांमध्ये गडचिरोलीतील ४३, अहेरी ८, आरमोरी ४, भामरागड तालुक्यातील १,  चामोर्शी ३, धानोरा तालुक्यातील १, एटापल्ली १,  कुरखेडा ३, सिरोंचा १, तर वडसा तालुक्यातील ४ जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या ३४ रूग्णांमध्ये गडचिरोली मधील १९,  अहेरी १, आरमोरी ६,  चामोर्शी १, धानोरा १, कोरची ३, तर वडसा  मधील ३ जणांचा समावेश आहे.

    नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितामध्ये  शिवनी १, रामपूरी वार्ड ५, गुरुकानगर गोंडवाना विद्यापीठ जवळ १, बुध्दविहार नवेगांव  कॉम्पलेक्स 4,  कन्नमवार वार्ड 5, लिटील फ्लॉवर शाळा वसा २,  नवेगांव 4, जेप्रा १, इंदाळा १, गोकुलनगर १, गांधीवार्ड २, आशिर्वाद नगर ४,  स्थानिक १, एसआरपीएफ कॅम्प २, जिल्हा परिषद कॉलनी १, सर्वोदय वार्ड १,  रामनगर १, गणेशनगर १, रामनगर १, कोटगल १, कॅम्प एरिया १, कुरखेडा तालुक्यातील गुरनोली 2,  वडेगांव १, वडसा तालुक्यातील बाधितामध्ये   राजेंद्र वार्ड १, वीरर्सी वार्ड १, स्थानिक १, कस्तुरबा वार्ड १, अहेरी  तालुक्यातील बाधितामध्ये नागेपल्ली २, आलापल्ली ४, स्थानिक २,   भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये बेजू १, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक २, वैरागड २,  चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये  आष्टी २, चौधमपल्ली १, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये मोयाबिनपेठा १, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक १,  तर इतर जिल्हयातील  बाधितामध्ये १ जणांचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.